श्री सोमनागेश्वर नाट्य कलामंच तळवली व प्रोलाईफ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल शृंगारतळी यांचा उपक्रम
गुहागर, ता. 13 : श्री सोमनागेश्वर नाट्य कलामंच तळवली व डॉ ओक यांचे प्रोलाईफ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल शृंगारतळी यांच्या संयुक्त विद्यमाने तळवली येथे श्री सोमनागेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिराला रुग्णांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. यावेळी डोळ्यांच्या स्पेशालिस्ट डॉ अश्विनी सचिन ओक यांनी सदर शिबिरात रुग्णांना मार्गदर्शन करून नेत्र तपासणी केली. या शिबिराचा 70 रुग्णांनी लाभ घेतला. Eye check up camp at Talvali
या शिबिरामध्ये नेत्र तपासणी अनुषंगाने असणाऱ्या प्राथमिक तपासण्या, डोळ्यांची तपासणी व चष्म्याचा नंबर काढणे आदी तपासण्या करुण मोफत ड्रॉप्स देखील देण्यात आले. तसेच शिबिरातील चष्मा व मोतीबिंदू ऑपरेशन सवलतीच्या दरात केले जाणार आहे. या शिबिरासाठी प्रोलाईफ हॉस्पिटलचे डॉ सचिन ओक, मॅनेजर दीपक मोरे, नर्स गायत्री, सिद्धी, रेणुका हॉस्पिटल स्टाफ, अनिरुद्ध शिगवण ऑप्टिक्सचे रुतेश शिगवण, स्वरा शिगवण आदी उपस्थित होते. सदर शिबिराच्या यशस्वीतेसाठी श्री सोमनागेश्वर नाट्य कलामंच,श्री सोमनागेश्वर सेवा मंडळ व भेळेवाडी ग्रामस्थ व महिला मंडळ यांनी विशेष मेहनत घेतली. Eye check up camp at Talvali