अध्यक्षपदी दिक्षा पवार तर उपाध्यक्ष अदिती कुलकर्णी
गुहागर, ता. 27 : तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रा. डॉ. जालिंदर जाधव मराठी विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ करिता मराठी वाङ्मय मंडळाच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. Executive Committee of the Board announced
पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वाङमय मंडळाच्या अध्यक्षपदी कु. दिक्षा पवार (तृतीय वर्ष वाणिज्य), उपाध्यक्ष कु. अदिती कुलकर्णी (द्वितीय वर्ष कला) सचिव कु. स्नेहल केंबळे (तृतीय वर्ष वाणिज्य), सहसचिव कु. मनाली नाचरे (तृतीय वर्ष वाणिज्य), कोषाध्यक्ष अमोल जाधव (प्रथम वर्ष वाणिज्य), सहकोषाध्यदक्ष कु. प्रणया गावडे (प्रथम वर्ष वाणिज्य), रेखाटन, विक्रांत भोसले (प्रथम वर्ष वाणिज्य), आदित्य गिजे (प्रथम वर्ष वाणिज्य), कु. गुंजन पटेल (तृतीय वर्ष वाणिज्य), कु. दीक्षा साळवी (द्वितीय वर्ष वाणिज्य), कु. आनंदिता आग्रे (द्वितीय वर्ष वाणिज्य), शुभम मांडवकर (द्वितीय वर्ष कला), कु. दीप्ती रहाटे (द्वितीय वर्ष कला), कु. नेत्रा पाध्ये (प्रथम वर्ष वाणिज्य), ऋषिकेश नांदलस्कर (प्रथम वर्ष कला), जनसंपर्क अधिकारी- आदित्य पालकर (प्रथम वर्ष वाणिज्य), रंजित पाष्टे (द्वितीय वर्ष कला), निखिल टानकर (प्रथम वर्ष वाणिज्य), कु. समृद्धी लाखन (प्रथम वर्ष वाणिज्य), कु. साक्षी पवार (प्रथम वर्ष वाणिज्य), कु. सानिका गुहागरकर (तृतीय वर्ष कला), कु. श्रावणी जाधव (प्रथम वर्ष कला) यांची निवड करण्यात आली. Executive Committee of the Board announced
नवनियुक्त वाङ्मय मंडळाच्या कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांनी अभिनंदन केले व पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सर्व वाड्मय मंडळाच्या कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. Executive Committee of the Board announced