प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पाहणी, ओझरवाडीतील रहिवाशांना पाण्याची तात्पुती व्यवस्था
गुहागर, ता. 01 : तालुक्यातील जानवळे हद्दीतील जलस्त्रोत दूषित प्रकरणी येथील ओझरवाडीतील 23 कुटुंबियांची पाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांना गुहागर पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाकडून ओझरवाडीतील एका बोअरवेलमधून पाणी उचलून ते टाकीमध्ये संकलित करुन पुरविण्यात येत आहे. त्यामुळे तात्पुरती पाण्याची व्यवस्था झालेली असली, तरी या परिसरातील नाल्यातील सांडपाण्याचे नमुने सोमवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतले असून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. Examination of sewage samples at Shringartali


शृंगारतळीतील वेळंब फाटाजवळून गेलेल्या नाल्यात तेथील रहिवाशी, व्यवसायिक यांनी सांडपाणी सोडल्याचा व त्यामुळे शृंगारतळीसह जानवळे हद्दीतील जलस्त्रोत दूषित झाल्याचा मुद्दा काही महिने गाजत आहे. यावर तालुका प्रशासनाने बरेच तोडगे काढले असले तरी अजूनही त्यांना यश आलेले नाही. या नाल्यात सांडपाणी सोडण्याचे प्रकार सुरुच आहेत. त्यामुळे परिसरातील जलस्त्रोत दूषित होऊन पाणी वापरण्यायोग नसल्याने काही रहिवाशांचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. यामध्ये विशेष करुन जानवळे ओझरवाडी येथील 23 कुटुंबियांना पाण्यापासून वंचित रहावे लागले होते. अशावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर यांनी तात्पुरता जार स्वरुपात पाणी सुरु केले होते. मात्र, तालुका प्रशासनाकडून कोणतीच कार्यवाही झालेली नव्हती. Examination of sewage samples at Shringartali


पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता मंदार छत्रे यांनी पाईपलाईन व पाच हजार लिटर टाकीची उपलब्धता करुन ओझरवाडी येथील एका बोअरवेलमधून पाईपलाईन टाकून टाकीमध्ये पाणी संकलित करुन ते तेथील रहिवाशांना उपलब्ध करुन दिले आहे. यासाठी गटविकास अधिकारी, तहसिलदार यांचेही सहकार्य लाभले होते. तरीसुध्दा येथील रहिवाशांना त्या टाकीतून पाणी ने-आण करणे, पंप आँपरेट करणे या सर्व गोष्टींना सामोरे जावे लागत आहे. Examination of sewage samples at Shringartali
दरम्यान, सांडपाणी नाल्यात सोडले जात असल्याने चिपळूणच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी शृंगारतळी गणेश विसर्जन व जानवळे, हद्दीतील भागाची पाहणी करुन तेथील सांडपाण्याचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविले आहेत. Examination of sewage samples at Shringartali