गुहागर, ता. 16 : गुहागर नगरपंचायत तर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अभियानांतर्गत माजी सैनिक व शालेय विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर नगरपंचायत मध्ये करण्यात आला. Ex-servicemen and students felicitated by the city panchayat


गुहागर शहरातील माजी सैनिक प्रकाश देवस्थळी व गुहागर शहरातील गुणवंत विद्यार्थी दहावी, बारावी, स्कॉलरशिप, नवोदय, विज्ञान परीक्षा यात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार भेट वस्तू देऊन करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे गुहागर हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे, नगरपंचायतचे लेखापाल गणेश भिड, जीवन शिक्षण शाळेचे मुख्याध्यापक वासावे, गुहागर पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज बावधनकर, अरुण गुरव, नगरपंचायतचे वरिष्ठ लिपिक जनार्दन साठले यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल धुमाळ यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नगरपंचायतचे प्रीतम वराडकर, सुनील नवजेकर, आशिष खांबे ,ओंकार लोखंडे, आश्विनी घाडगे व प्रेरणा बेंडल यांनी प्रयत्न केले. Ex-servicemen and students felicitated by the city panchayat