गुहागर, ता. 10 : वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये हरघर तिरंगा उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांच्या हातात तिरंगा ध्वज व क्रांतिकारकांची नावे असणारे फलक देऊन प्रभात फेरी काढण्यात आली. तसेच नशामुक्त भारत अभियानांतर्गत कार्यशाळा आयोजित करण्यात आली व अंमली पदार्थ विरुद्ध प्रतिज्ञा घेण्यात आली. Every home Tiranga Prabhatferi at Veldur School
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मनोज पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुदाम कोळथरकर, शिक्षणप्रेमी शंकर कोळथरकर, शाळेच्या उपशिक्षिका अंजली मुद्दमवार, धन्वंतरी मोरे, सुषमा गायकवाड व पदवीधर शिक्षिका अफसाना मुल्ला त्याचबरोबर अंगणवाडी सेविका सोनिया नाटेकर व मत्स्यगंधा कोळथरकर अंगणवाडी मदतनीस गीता वरवटकर, वैष्णवी कदम उपस्थित होत्या. शाळेच्या उपशिक्षिका अंजली मुद्दमवार यांनी हर घर तिरंगा व नशा मुक्त भारत या अभियाना विषयी मार्गदर्शन केले. शाळेच्या पदवीधर शिक्षिका अफसाना मुल्ला यांनी नशा मुक्त भारत अभियानाविषयी मार्गदर्शन केले.त्याचबरोबर शाळेचे मुख्याध्यापक मनोज पाटील यांनी हर घर तिरंगा व नशा मुक्त भारत होणे गरजेचे आहे याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले. नवानगर गावचे शिक्षण प्रेमी शंकर कोळथरकर यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन सुषमा गायकवाड यांनी केले. आभार प्रदर्शन धन्वंतरी मोरे यांनी केले. Every home Tiranga Prabhatferi at Veldur School