संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 07 : जागतिक पर्यावरण दिन ५ जून रोजी साजरा केला जातो. पर्यावरणाच्या रक्षणासाठी जागृकता आणि कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख साधन आहे. आपले जिवन हे स्वच्छ आणि संतुलित पर्यावरणावर अवलंबून आहे. पर्यावरणातील प्रदुषणामुळे मागील काही दशकांत मानवी जिवन व निसर्ग अस्ताव्यस्त झाले आहेत हि समस्या ओळखून सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोलीच्या संयुक्त विद्यमाने वृक्षलागवड व वृक्षारोपणाचा संकल्प करून प्रत्यक्षात कृती करण्यात आली. Environment Day by Suyash Computer
यासाठी विद्यार्थी व नागरीकांना प्रोत्साहन व जागृकता पसरविण्याचे काम सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोली यांचे वतीने करण्यात आले. या कार्यक्रमाला युवा शेतकरी उदय चंद्रकांत झगडे उपस्थित होते. त्यांनी उपस्थित सर्वांना झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देऊन मौलिक मार्गदर्शन केले. यावेळी सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोलीचे संचालक श्री.संदेश साळवी, संचालिका सौ.सावी साळवी यांचेसह कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक बहूसंख्येने उपस्थित होते. Environment Day by Suyash Computer