गुहागर नगरपंचायत, प्रकृति फाऊंडेशन आणि मर्म फाऊंडेशनतर्फे आयोजन
गुहागर, ता. 02 : गुहागर नगरपंचायत, प्रकृति फाऊंडेशन आणि मर्म फाऊंडेशन यांच्या वतीने दिनांक ३१ मे रोजी गुहागर शहरातील बचत गटातील महिलांसाठी उद्योजकता विकास कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत बचत गटातील महिलांसाठी पर्स तयार करणे आणि बटिक कापड तयार करणे हे प्रात्यक्षिके महिलांकडून करुन घेण्यात आली. Entrepreneurship workshop for women
गुहागर नगरपंचायतीमधील बचत गटातील महिलांसाठी उद्यमशीलता विकसित करून त्यांना मार्केटिंगसाठी उत्तम दर्जाच्या पर्स आणि खूप मागणी असलेले बटिक कापड तयार करून घेण्याची कला शिकवण्यात आली. त्याचबरोबर या महिलांसाठी अगदी मोफत वेगवेगळ्या वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण मर्म संस्थेकडून व मार्केटिंग स्किल प्रकृति फाऊंडेशन कडून देण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे पर्यावरण आणि महिला सबलीकरण हे दोन्ही उद्देश साध्य होत आहेत, असे संथेच्या मिलन गुरव- जंगम यांनी सांगितले. टाकावू जीन्स मधून महिलांसाठी एक ओळख निर्माण करणारा उद्योग उभा करता येवू शकतो असे मर्म संस्थेच्या मेधा शहा आणि मुग्धा देसाई यांनी सांगितले. तर विविध प्रकारच्या पर्स आणि ज्वेलरी आपण घरबसल्या कसे तयार करू शकतो तसेच टाकवू तून टिकावू काय काय तयार करू शकतो याची माहिती आणि प्रत्यक्ष काही वस्तू बनवून दाखवल्या. Entrepreneurship workshop for women
ज्या व्यक्ती किंवा संस्था या पर्यावरणीय कार्य आणि महिला सबलीकरण यामध्ये काम करायचंय त्यानी या कार्यात सहभागी होण्याच आवाहनही या संस्थांनी केले आहे. या उपक्रमासाठी गुहागर नगरपंचायतीच्या समूह सांघटिका सुचेता आंबोकर, अवंती गमरे, श्री. साठले यांनी विशेष साहाय्य केले. तर दोन्ही संस्थांच्या वतीने मिलन जंगम- गुरव, मेधा शहा, मुग्धा देसाई आणि गुहागर परिसरातील अनेक महिला या कार्यक्रमास उपस्थित होत्या . प्रकृति फाऊडेशन च्या वतीने येणाऱ्या महिलांपैकी अनिता राऊत या भाग्यवान विजेतीला एक सुंदर साडी भेट देण्यात आली. Entrepreneurship workshop for women