मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या माध्यमातून आयोजन
गुहागर, ता. 11 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या माध्यमातून गुहागर विधानसभा क्षेत्रातील युवक युवतीना शृंगारतळी येथील मनसे संपर्क कार्यालयामध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजने संदर्भात जनजागृती मेळावा आयोजित करण्यात आला होता. सदरील मेळाव्याचे मुख्य उद्दिष्ट नवउद्योजक तयार करून त्यांना रोजगार निर्मिती करणे हा होता. तसेच सदरील मेळाव्यामध्ये प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मध केंद्र योजना, विश्वकर्मा योजना या योजनांची माहिती महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, रत्नागिरीहे पर्यवेक्षक अमित इंदुलकर यांनी दिली. Employment Guidance Camp at Sringaratali
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ मार्फत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजने अंतर्गत युवकांना रोजगार निर्मिती मार्गदर्शन व नवीन उद्योग करण्यास प्रवृत्त करण्यात आले. युवक युवतीना स्थानिक स्तरावर रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, हा या कार्यकमाचा मुख्य उद्देश होता. Employment Guidance Camp at Sringaratali
यावेळी बोलताना अमित इंदुलकर यांनी राज्याच्या नवीन औद्योगिक धोरण २०१९ अंतर्गत अनेक नावीन्यपूर्ण योजना व कार्यक्रम महाराष्ट्र शासनाने हाती घेतले आहेत. सूक्ष्म व लघु उपक्रमांना चालना देणेसाठी तसेच राज्यात व्यापक प्रमाणात रोजगाराच्या संधी स्थानिक ठिकाणी उपलब्ध होणेसाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना जाहीर केली आहे. यासाठी ग्रामीण भागासाठी केव्हीआयबी या एजन्सीकडे शासनाने कामकाज दिलेले आहे. त्यासाठी ग्रामीण उद्योजकांनी या संधीचा फायदा घ्यावा. राज्यातील युवक-युवतींना स्वयंपूर्ण आत्मनिर्भर बनविण्यासाठी, त्यांचे स्वयंरोजगार प्रकल्प राज्य शासनाच्या आर्थिक साहाय्यातून सुलभतेने स्थापित होऊन पुढील पाच वर्षात सुमारे १ लाख सूक्ष्म-लघु उपक्रम स्थापित होणे व त्या माध्यमातून एकूण १० लाख रोजगार संधी राज्यात उपलब्ध होणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. खादी आयोगाने ठरविलेल्या नकारात्मक उद्योगाव्यतिरिक्त सर्व उद्योग या योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. यामध्ये मांस प्रक्रिया, कॅनिंगशी संबंधित उद्योग बीडी, पान, सिगार, तंबाखू, हॉटेल/ढाबा ज्यामध्ये मद्य विक्री होते. शेती पिके, चहा, कॉफी, रबर शेती, रेशीम, हॉर्टिकल्चर फुलशेती पशुपालन, कुक्कुट पालन इ. उद्योगाचा समावेश आहे. तरी जास्तीत जास्त युवकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पर्यवेक्षक अमित इंदुलकर यांनी केले. Employment Guidance Camp at Sringaratali