महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद सेवा निवृत्त कर्मचारी सेवा समिती गुहागर आयोजित
गुहागर, ता. 10 : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद सेवा निवृत्त कर्मचारी सेवा समिती तालुका शाखा गुहागर पेन्शनर्स संघटनेची जनरल सभा पाटपन्हाळे ग्रामपंचायत सभागृहात संघटना अध्यक्ष दत्तात्रय पर्शुराम गुरव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी गुहागर पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी आणि सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार करण्यात आला. Employee felicitation by Retired Staff Committee
राज्य संघटना कोषाध्यक्ष विश्वनाथ गणपत बेलवलकर, जिल्हा कोषाध्यक्ष कृष्णा बाबू उकार्डे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य व विभागीय अध्यक्ष दिवाकर धोंडू कानडे, कार्याध्यक्ष विश्वास जयराम बेलवलकर यांच्या उपस्थितीत जनरल सभेत ७५ वर्षे झालेल्या सेवानिवृत्त सभासदांचा शाल श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्तांची तत्परतेने व आत्मियतेने वेळीच कामे केल्याबद्दल अतिउत्कृष्ट कामासाठी संतोष भिकाजी गमरे (सहाय्यक प्रशासन अधिकारी पंचायत समिती गुहागर), वैभव सखाराम कदम (सहाय्यक प्रशासन अधिकारी पंचायत समिती गुहागर सद्या पंचायत समिती दापोली), संदिप शशिकांत बागकर (वरिष्ठ सहाय्यक शिक्षण विभाग), आशिष धोंडू शिगवण (कनिष्ठ सहाय्यक पंचायत समिती गुहागर), किरण नामदेव शिंदे (पदवीधर शिक्षक), समिर शिवाजी आंब्रे (कनिष्ठ सहाय्यक) आदींचा शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. Employee felicitation by Retired Staff Committee
सेवा निवृत्त कर्मचारी/अधिकारी यांचे सेवानिवृत्ती संबंधीचे प्रस्ताव, सेवापुस्तके अद्यावतीकरण, सेवा निवृत्ती नंतरचे लाभ मिळवून देणे, रिवाईज पेंशन प्रकरणे, वरिष्ठ निवडश्रेणी प्रस्ताव करणे व आस्थापना विषयक कामे करणे, कक्ष समेत विविध समस्या निकाली काढणे याबाबतच्या अतिउत्कृष्ट सेवेबद्दल अधिकारी कर्मचारी यांचा जनरल सभेत गौरव करण्यात आला. तसेच सन २०२४ मध्ये सेवानिवृत्त झालेल्या सभासदांचा शाल श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. Employee felicitation by Retired Staff Committee
या सत्कार समारंभासाठी गुहागर तालुका कार्यकारिणी उपाध्यक्ष गंगाधर राया जाधव, सरचिटणीस शांताराम लक्ष्मण बेंडल, कोषाध्यक्ष विनायक विष्णू काणेकर, सहसरचिटणीस सिध्दार्थ शिवराम जाधव, रमेश केशव जाक्कर, संघटक संतोष गंगाराम धामणस्कर, सल्लगार रामचंद्र रत्नू हुमणे, सुलतान रसुल मुलाणी, संघटना सदस्य विजया सुभाष कोळवणकर, शर्मिला विलास चव्हाण, अस्मिता अनंत पराडकर, सुप्रिया जयप्रकाश वेल्हाळ, रविंद्र गोपाळ इंदुलकर, देवराम पांडूरंग जाधव नामदेव गणपत असगोलकर, इलाई बापू नदाफ, रमेश गोपाळ बेंडल, वासुदेव महादेव पांचाळ, गणपत कृष्णा पांचाळ, दिपक शांताराम तावडे आदी उपस्थित होते. या सर्व सत्कारमूर्ती जिल्हाध्यक्ष बबन बांडागळे, राज्य कोषाध्यक्ष विश्वनाथ बेलवलकर यांनी अभिनंदन केले. Employee felicitation by Retired Staff Committee