• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
12 May 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आक्रमक नेत्याला अश्रु अनावर

by Ganesh Dhanawade
May 1, 2025
in Guhagar
323 3
0
Emotional MLA Bhaskar Jadhav
634
SHARES
1.8k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

घरकाम करणाऱ्या मुलीच्या लग्नात भास्करराव  हळवे झाले

गुहागर, ता. 01 : महाराष्ट्रातील एक आक्रमक नेता, कोकणची बुलंद तोफ म्हणून ओळख असलेले गुहागरचे आमदार एका लग्नात हळवे झाले. गेली आठ वर्ष ही मुलगी आमदार भास्कर जाधव यांच्या घरी कामाला होती. घरकाम करत असली तरी जाधव कुटुंबाने या मुलीला आपल्या मुलीप्रमाणे सांभाळले होते. तिच्या लग्नानंतर मुलगी जाधव कुटुंबाचा आशिर्वाद घेण्यासाठी आली त्यावेळी आमदार जाधव यांनाही अश्रु अनावर झाले. संघर्षरत नेत्याला असे भावनाविवश झालेले पाहून काहीकाळ लग्नमंडपातही शांतता पसरली होती. Emotional MLA Bhaskar Jadhav

गुहागर तालुक्यातील पांगारी गावातील सुप्रिया पाटील ही मुलगी आमदार जाधव यांच्या घरी गेली आठ वर्ष कामाला होती. अल्पावधीतच आपल्या वागणुकीने सुप्रियाने जाधव कुटुंबातील सर्वांचेच मन जिंकले. आमदार भास्कर जाधव  यांच्या कुटुंबियांनीदेखील तिला आपल्या मुलीप्रमाणेच सांभाळले. सुप्रियाचे लग्न ठरवण्याच्या प्रक्रियेपासून ते लग्न होईपर्यंत सर्व टप्प्यावर जाधव कुटुंबाचा सहभाग होता. Emotional MLA Bhaskar Jadhav

1 मे रोजी सुप्रियाच्या लग्नाला संपूर्ण जाधव कुटुंब पांगारी सडेवाडीत आले होते. मुहूर्तावर विवाह झाला. सात फेरे झाले. त्यानंतर आमदार जाधव,, सौ. सुवर्णावहिनी, सुनबाई सौ. स्वराताई यांना भेटण्यासाठी सुप्रिया आली. तिने सौ. सुवर्णावहिनांना मिठी मारली आणि रडू लागली. हे पाहून शेजारी उभे असलेले आमदार भास्कर जाधव यांना देखील अश्रु अनावर झाले. सुप्रियाचे वडिल मानाचा नारळ आमदारांना देण्यासाठी आले मात्र आमदार रडत असल्याचे पाहून ते ही निशब्द झाले. क्षणभर सर्वांनाच नेमके काय झाले ते कळेना. सौ. सुवर्णावहिनींनी सुप्रियाची समजूत घातली. आमदार जाधव यांनीही स्वत:ला सावरले. सुप्रियाच्या पतीला आणि सासरच्या मंडळींना सुप्रिया ही माझ्या मुलीसारखी नव्हे तर माझी मुलगीच आहे. ती लक्ष्मी आहे. तुमच्या घराची ती नक्कीच भरभराट करेल. त्यामुळे तुम्हीसुद्धा तिला मुलीप्रमाणे प्रेम द्या.’ असे सांगितले. हे सर्व दृष्य पहाणारी मंडळी यावेळी अवाक झाली होती. कडक शिस्तीचे, आक्रमक बोलणारे, आमदार भास्कर जाधव सर्वांनीच पाहीले होते. मात्र आज याच नेत्याचे हळवेपण सर्वांनी अनुभवले. Emotional MLA Bhaskar Jadhav

Tags: Emotional MLA Bhaskar JadhavGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share254SendTweet159
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.