गुहागर, ता. 26 : शिवजयंती निमित्त खरे ढेरे भोसले महाविद्यालयाच्या एनएसएस विभागातर्फे वकृत्व स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत कुमारी अंतरा असगोलकर, कुमारी अर्पिता पावसकर, कु. यश म्हसकर, कु. समृद्धी घडवले आणि कु. अनिशा कानसरे इत्यादी विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता. तसेच एस. वाय. बी. एस. सी. ची विद्यार्थिनी कुमारी दीक्षा रांजणे व रिया पिंपळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर एक सुंदर गाणं सादर केलं. अपूर्व रोहिलकर आणि सुरज कलंबटे तसेच यश साळवी, अथर्व वराडकर, मारुती पालकर या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा सादर केला. Elocution Competition on the occasion of Shiv Jayanti
यावेळी माजी इतिहास प्रा. सौ. रश्मी आडेकर यांनी आपल्या मनोगतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बाहेरून आलेल्या परकीय प्रवाशांनी महाराजांवर केलेले लेखन आजच्या काळासाठी महत्त्वाचे असल्याचे सांगितले. तसेच महाराजांच्या अंगी असलेले गुणवैशिष्ट्यांचे वर्णन करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मार्गताम्हाणे महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. शलाका कदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची अतिशय जिज्ञासा पूर्ण अशी माहिती विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून दिली. यामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बाहेरून आलेल्या परकीय ब्रिटिश, फ्रेंच आणि पोर्तुगीज प्रवाशांबद्दलची माहिती दिली. तत्कालीन त्यांच्या प्रवास वृत्तातांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची अधिक विश्वसनीय अशी माहिती उपलब्ध आहे, असे त्यांनी सांगितले. Elocution Competition on the occasion of Shiv Jayanti


या स्पर्धेसाठी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे अध्यक्ष म्हणून लाभले होते . तसेच या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून मार्गताम्हाणे कॉलेजच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉ. शलाका कदम मॅडम उपस्थित राहिल्या होत्या. तसेच महाविद्यालयाच्या इतिहास प्रा. सौ. रश्मी आडेकर मॅडम यादेखील परीक्षक म्हणून कार्यक्रमास उपस्थित होत्या. Elocution Competition on the occasion of Shiv Jayanti
प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे यांनी आपल्या कवितेमधून आजच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. महाराजांच्या काळातील सामान्य शेतकऱ्यांचे जीवन आणि आजच्या घडीला असणारे शेतकऱ्यांचे जीवन यांतील तफावतीचे कारण त्यांनी आपल्या कवितेतून विद्यार्थ्यांसमोर मांडले. यानंतर परीक्षकांनी विजेत्या विद्यार्थ्यांची नावे जाहीर करून विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वाटप केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. महेंद्र गायकवाड यांचेही या कार्यक्रमास सहकार्य लाभले. त्यानंतर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन एस. वाय. बी.ए.चा वर्ग प्रतिनिधी कुमार यश म्हसकर याने केले, आणि सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. Elocution Competition on the occasion of Shiv Jayanti