गुहागर, ता. 07 : संविधानाचे जनक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त महापरिनिर्वाण दिन वेलदूर-नवानगर मराठी शाळेमध्ये साजरा करण्यात आला. थोर समाज सुधारक बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश दिला. यावेळी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. Elocution Competition on Mahaparinirvana Day
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग दाखवला. या स्पर्धा लहान गट आणि मोठा गट अशा दोन गटामध्ये घेण्यात आली. लहान गटामध्ये प्रथम – कु. शुभ्रा श्रीधर कोळथरकर, द्वितीय – कु.शौर्या महेश पालशेतकर तर तृतीय – कु.अन्वी प्रवीण जांभारकर तसेच मोठा गटामध्ये प्रथम – कु.अर्णवी पुंडलिक नाटेकर, द्वितीय – कु.संस्कार कल्पेश रोहिलकर तर तृतीय – कु. आर्या पुंडलिक नाटेकर या सर्वांना फुल-गुच्छा देवून गौरविण्यात आले. Elocution Competition on Mahaparinirvana Day
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक डॉ.मनोज पाटील यांनी मुलांना बाबासाहेबांच्या चरित्रावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान कु.नैतिक हरचकर याने स्वीकारले. यावेळी सौ.अंजली मुद्दमवार, श्रीम.सोनाली खडपे, श्रीम.रेवती साखरकर, कु. परिक्षित दाभोळकर आणि विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कु.सलोनी पालशेतकर उपस्थित होते. Elocution Competition on Mahaparinirvana Day