गुहागर, ता. 30 : तालुक्यातील वडद ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्वच वाडी वस्त्यातील वीजेचे खांब गंजलेल्या अवस्थेत असून महावितरणकडे वेळोवेळी पत्र व्यवहार, निवेदन तसेच याची माहिती देऊन देखील गंजलेले वीजेचे खांब बदलले जात नाहीत. रामचंद्र गावणंग यांच्या घराजवळील वीजेचा खांब तर पूर्णतः वाकला आहे. गंभीर दुर्घटना होण्याची भीती व्यक्त होत आहे. Electricity poles in Vadad are in a rusty state
महावितरण गुहागर आणि तळवली कार्यालयाला वडद ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जवळजवळ सतत तीन वर्षे पत्र व्यवहार करून सुध्दा लक्ष देत नाहीत. वीजेचे खांबे हे वस्तीत असल्यामुळे जिवित हानी झाली तर त्याला जबाबदार कोण? असाही सवाल नागरिक विचारत आहेत. व्यक्तिगत व्यक्तीकडून वीजेच्या खांबाचे नुकसान केल्यानंतर तत्पर सेवा उपलब्ध करून मोडलेल्या वीज खांबा बदलला जातो. मग नागरिक मागणी करूनही खांब का बदलला जात नाही? असा सवाल नागरिक विचारत आहेत. पावसाळयात एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास महावितरणचे अधिकार्यांची जबाबदारी असेल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. Electricity poles in Vadad are in a rusty state