• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 May 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक बिनविरोध

by Mayuresh Patnakar
February 9, 2023
in Guhagar
121 1
0
Election of Purchase and Sale Team unopposed
237
SHARES
678
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

चेअरमन पदी डॉ.अनिल जोशी तर व्हा.चेअरमन पदी रवींद्र अवेरे

गुहागर, ता. 09 : गुहागर तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीमध्ये सर्वपक्षीय सहकार पॅनलने महाविकास आघाडी पॅनलवर 12 विरुद्ध 3 ने विजय मिळविला होता.  निवडणुक निर्णय अधिकारी कुमार देवरुखकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर तालुका खरेदी विक्री संघ कार्यालयात पार पडलेल्या पदाधिकारी निवडीमध्ये रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सन्मा. डॉ.अनिल जोशी (नरवण) यांची चेअरमन पदी तर व्हा. चेअरमनपदी आंबेरे खुर्दचे सरपंच रवींद्र अवेरे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.  Election of Purchase and Sale Team unopposed

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन सन्मा.डॉक्टर तानाजीराव चोरगे साहेब यांच्या प्रेरणेने या गुहागर तालुका खरेदी विक्री संघातील सहकार पॅनलला प्रारंभ झाला होता. या सहकार पॅनलला माजी आमदार डॉ.विनय नातू यांचे विशेष मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले आणि यामुळेच हे सहकार पॅनल या संघाच्या निवडणुकीमध्ये यशस्वी होऊन आज त्याचे नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली. गुहागर तालुका खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून गुहागर तालुक्यातील शेतकऱ्यांना नियमित खतपुरवठा व त्यांच्या शेतमालाला योग्य न्याय मिळवून देऊन गुहागर मधील शेतकरी आर्थिक संपन्न होण्यासाठीचे प्रयत्न सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन करणार आहे.  असे डॉ.अनिल जोशी यांनी अध्यक्ष पदी निवड झाल्यावर सांगितले. Election of Purchase and Sale Team unopposed

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

डॉ.अनिल जोशी आणि रवींद्र अवेरे यांच्या निवडीचे गुहागर तालुक्यातून अभिनंदन होत असून त्यांच्याकडून खरेदी विक्री संघ आर्थिक सक्षम आणि शेतकरी स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने तालुका अपेक्षा ठेवून आहे. यावेळी सुरेश सावंत, श्रीकांत महाजन, लक्ष्मण शिगवण, सुभाष कोळवणकर, सुरेश चौगुले, सिराज घारे, शाम गडदे, गणेश तांबे, सौ. रश्मी घाणेकर, सौ.अश्विनी जोशी, सचिन बाईत, पांडुरंग कापले, पंकज बिर्जे  आदी सर्व नूतन संचालक यावेळी उपस्थीत होते.  Election of Purchase and Sale Team unopposed

Tags: Election of Purchase and Sale Team unopposedGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share95SendTweet59
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.