वेलदूर नवनगर मराठी शाळेतील विद्यार्थिनी
गुहागर, ता. 27 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवानगर शाळेतील विद्यार्थिनी सलोनी सुदर्शन पालशेतकर इयत्ता सातवी हिला अखिल गुहागर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने देण्यात येणारा एकलव्य पुरस्कार जाहीर झाला आहे. सलोनी ही अत्यंत सुस्वभावी, शिस्तबद्ध विद्यार्थिनी असून अभ्यासाबरोबरच रंगभरण, चित्रकला, सांस्कृतिक, नृत्य कला, गायन विषयाची आवड असून विविध स्पर्धा परीक्षेमध्ये तिने यश संपादन केले आहे. Eklavya Award announced to Saloni Palshetkar


सलोनी हीला एकलव्य पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सानिया नाटेकर, उपाध्यक्ष सुरक्षा रोहिलकर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष शंकर कोळथरकर, माजी सरपंच नंदकुमार रोहीलकर, सुहानी नाटेकर, सुषमा रोहिलकर, चेतना जांभाररकर, श्रुती शिरगावकर, तन्वी पालशेतकर, मनश्री पालशेतकर, संचिता पालशेतकर, अंजली मुद्दमवार, मुख्याध्यापक मनोज पाटील, कार्तिकी दाभोळकर, जानवी हरचकर, सायली दाभोळकर, अर्चना रोहिलकर, वंशिका आंबेरकर, मृदुला जांभरकर, प्रिया रोहीलकर, अंकिता कोळथरकर, सोनाली खडपे, अंकिता कोळथरकर, रीना रोहीलकर, पूजा वनकर, दीपिका रोहीलकर, सलोनी वनकर, रीना खडपकर, विद्या रोहीलकर, संध्या पालशेतकर, ग्रामपंचायत सदस्य मारुती रोहीलकर, प्राजक्ता जांभारकर यांनी अभिनंदन केले आहे. Eklavya Award announced to Saloni Palshetkar