• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

शीर ग्रामपंचायत तर्फे शाळा शीर येथे दप्तराचे वाटप

by Ganesh Dhanawade
August 7, 2024
in Guhagar
94 1
0
Educational material to students by Sheer Gram Panchayat

शीर ग्रामपंचायत तर्फे आदर्श केंद्र शाळा शीर येथील विध्यार्थीना दप्तराचे वाटप करताना

184
SHARES
525
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 07 : पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून शैक्षणिक निधी अंतर्गत आदर्श केंद्र शाळा शीर नंबर १ येथे शीर ग्रामपंचायतीतर्फे दप्तराचे वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामविकास अधिकारी एम. आर. देवकाते यांनी ग्रामपंचायतीतर्फे प्रतिवर्षी गावातील सर्व शाळांना विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करत असल्याचे तसेच भौतिक गरजांची पूर्तता करण्यात येत असल्याचे सांगितले. Educational material to students by Sheer Gram Panchayat

शीर ग्रामपंचायतचे सरपंच विजय धोपट, उपसरपंच रामचंद्र पवार, पोलीस पाटील पूर्वा भाटकर, ग्रामविकास अधिकारी एम.आर. देवकाते तसेच तंटामुक्ती अध्यक्ष गणपत ठोंबरे, प्रतिष्ठित नागरिक शंकर मोरे, नारायण मोरे, टी. डब्ल्यू.जे. या संस्थेचे प्रतिनिधी आशिष कांबळे यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना दप्तराचे वाटप करण्यात आले. शीर गावच्या पोलीस पाटील पूर्वा भाटकर यांनी ग्रामपंचायत विद्यार्थ्यांसाठी एवढा खर्च करत आहे तर विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने अभ्यास करून याची परतफेड करावी, असे आवाहन केले.  Educational material to students by Sheer Gram Panchayat

मुख्याध्यापक सुहास गायकवाड यांनी यावर्षी शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाची दप्तरे दिल्याबद्दल तसेच शाळेला नेहमीच ग्रामपंचायतीतर्फे सहकार्य होत असल्याबद्दल सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामविकास अधिकारी, कर्मचारी यांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन अमराळे यांनी केले. यावेळी शिक्षिका प्रमोदिनी गायकवाड, मृणाली रेडेकर ग्रामपंचायत लिपीक सतीश पवार, कर्मचारी महेश पवार उपस्थित होते. Educational material to students by Sheer Gram Panchayat

Tags: Educational material to students by Sheer Gram PanchayatGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share74SendTweet46
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.