रौप्य महोत्सवानिमित्त दोन दिवशीय विशेष कार्यक्रमांचे आयोजन
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 13 : तालुक्यातील उमराठ येथील श्रीदत्तगुरु सेवा मंडळ गोरीवलेवाडीतर्फे श्रीदत्त जयंती रौप्य महोत्सवी कार्यक्रम शनिवारी १४ व रविवारी १५ डिसेंबर २०२४ रोजी विशेष कार्यक्रम संपन्न होणार आहेत. यामध्ये धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यदायी, सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. Dutt Jayanti at Umratha


शनिवारी १४ डिसेंबर २०२४ रोजी श्रीदत्तगुरु पादुका पालखीची उमराठ गावात भव्य मिरवणूक, श्री दत्तगुरुंचा नाम घोष, श्रीदत्तगुरु जन्मोत्सव, महिला हळदी कुंकू, महाप्रसाद (भंडारा ) रात्री ८.०० वाजता शालेय मुलांचे सत्कार व रात्री १०.०० वाजता मुलांचे रेकॉर्ड डान्स हे कार्यक्रम सादर होणार आहेत.
रविवारी १५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता शृंगारतळीमधील डॉ.राजेंद्र पवार दवाखाना व डेरवण ट्रस्ट यांच्या सहकार्याने आरोग्य शिबिर व रक्तदान कार्यक्रम, श्रीसत्यनारायण महापूजा, माहेरवाशीण व जावई सत्कार, दुपारी २ वा. लॉटरी लकी ड्रॉ सोडत, मान्यवरांचा सत्कार समारंभ, सायं.६ वा. महाप्रसाद (भंडारा ) रात्री ८.०० वाजता मान्यवर सत्कार सोहळा, दिनदर्शिका प्रकाशन व लॉटरीमधील यशस्वीतांना बक्षीस वितरण तसेच रात्री १० वा. ” कोकणचा साज संगमेश्वरी बाज ” या लोककलेचा कार्यक्रम सादर होणार आहे. Dutt Jayanti at Umratha


सदर कार्यक्रमांसाठी श्रीदत्तगुरूंच्या भक्तजनांनी उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन श्रीदत्तगुरु सेवा मंडळ उमराठ गोरीवलेवाडीचे मुंबई अध्यक्ष रमेश यशवंत गोरीवले, सचिव चेतन शांताराम गोरीवले, कार्याध्यक्ष संदीप हरिश्चंद्र गोरीवले, स्थानिक अध्यक्ष महेश लक्ष्मण गोरीवले, सल्लागार शांताराम रत्नू गोरीवले, महिला मंडळ अध्यक्ष सविता संजय गोरीवले व पदाधिकारी तसेच वाडीतर्फे आवाहन करण्यात आले. Dutt Jayanti at Umratha