गुहागर, ता. 12 : वरचापाट येथील श्री दत्त प्रासादिक मंडळाच्या वतीने श्री दत्त मंदीरात श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त शुक्रवार दि. 13 ते बुधवार दि.18 डिसेंबर या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सदर कार्यक्रमांसाठी भक्तजनांनी उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन श्री प्रासादिक मंडळ गुहागर वरचापाटचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी केले आहे. Dutt Jayanti at Guhagar Varchapat
यानिमित्ताने शुक्रवार दि. 13 रोजी सकाळी 7 ते 12 या वेळेत दत्तयाग, शनिवार दि. 14 रोजी सकाळी 6 ते 6.30 वा. काकड आरती, सकाळी 7 ते 8 वा. श्रींची पूजा, सकाळी 9 ते 9.30 वा. श्रींची वारी व भजन, सकाळी 9.30 ते 12.30 वा. गावातील वारी, दुपारी 12.30 ते 1.30 वा. पोथी वाचन व जन्मकाळ, दुपारी 1.30 ते 2.30 वा. महाप्रसाद.
संगीत भजने – सायं. 4 ते 5.30 वा. सिद्धकला भजन मंडळ, गुहागर यांचे भजन, सायं. 5.30 ते 6.30 वा. पिंपळादेवी महिला भजन मंडळ वरचापाट याचे भजन, सायं. 7 ते 9 वा. चैतन्य सांप्रदाय भजन मंडळ पालपेणे कुंभारवाडी यांचे भजन, रात्रौ. 9 ते 10 वा. श्री महाकाली भजन मंडळ गुहागर कीर्तनवाडी यांचे भजन, रात्रौ. 10 ते 11 वा. श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ वरचापाट यांचे भजन, रात्रौ. 11 वा. निमंत्रित भजनांचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. (सूचना – निमंत्रित भजनांचे नंबर हे जन्मकाळ झाल्यानंतर लॉटरी पद्धतीने काढले जातील.) Dutt Jayanti at Guhagar Varchapat
रविवार दि. 15 रोजी दुपारी 12 ते 2 वा. महाप्रसाद, रात्रौ. 10 ते 11 वा. श्रीदत्त प्रासादिक भजन मंडळ वरचा पाट यांचे भजन, रात्रौ. 11 वा. श्रींच्या पालखीची मिरवणूक
मंगळवार दि. 17 रोजी रात्रौ. 10.40 वा. टॅक्स फ्री व साडी उडाली आकाशी या एकांकिका सादर करण्यात येणार आहे.
बुधवार दि. 18 रोजी रात्रौ. 10.30 वा. स्थानिक कलाकारांचे मनोरंजनाचे कार्यक्रम व मंगळागौर सादर करण्यात येणार आहे. तरी सदर कार्यक्रमांसाठी भक्तजनांनी उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन श्री दत्तप्रसाधिक मंडळ गुहागर वरचापाटचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी केले आहे. Dutt Jayanti at Guhagar Varchapat