गुहागर, ता. 15 : तालुक्यातील वरवेली आगरेवाडी फाटा येथे खडीने भरलेला डंपर रस्त्या शेजारील शेतामध्ये पलटी झाला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. वरवेली आगरवाडी फाटा येथे रस्त्यामध्ये असलेल्या खड्ड्यामुळे अनेक वाहने आपटण्याचे प्रकार होत आहे. सदर रस्ता खचलेला असल्याने अनेक छोटे अपघात याठिकाणी होत असतात. Dumper full of gravel overturned at Varveli


गुरुवारी सकाळी एम एच ०८ ए.पी.१२३४ या क्रमांकाचा अमोल पाटील यांच्या मालकीचा डंपर चालक सागर पवार याने रामपूर क्रशर येथून खडी भरून वरवेली बौद्धवाडी येथील रस्ता डांबरीकरण कामाच्या ठिकाणी येत होता. परंतु वरवेली आगरवाडी येथील फाट्याजवळ रस्त्यात असलेल्या खड्ड्यामध्ये डंपर आपटल्याने डंपरचा पाटा तुटला व डंपर रस्त्यानजीक असलेल्या शेतामध्ये पलटी झाला. Dumper full of gravel overturned at Varveli


सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबतच्या सूचना देऊनही अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. या रस्त्याचे डांबरीकरण करत असताना देखील अनेक वेळा येथे नागरिकांनी या खचलेल्या रस्त्या संदर्भात संबंधित ठेकेदाराला याची माहिती दिली होती. परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आले. तसेच या रस्त्याच्या दुतर्फा रेलिंग किंवा संरक्षण भिंतीची आवश्यकता असून या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. Dumper full of gravel overturned at Varveli

