गुहागर, ता. 12 : शृंगारतळीतील कॅनरा बँकेच्यावर असलेल्या युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटरतर्फे विद्यार्थ्यांसाठी प्रथमच “ड्रोन मेकिंग वर्कशॉप” चे यशस्वी आयोजन करण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना नवीन कौशल्ये आत्मसात करता यावीत, या उद्देशाने ही कार्यशाळा घेण्यात आली. Drone Making Workshop at Unitech Computer


सर्व विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत सक्रिय सहभाग घेतला आणि ड्रोन तयार करण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष अनुभवली. या कार्यक्रमात त्यांनी नवीन तंत्रज्ञान समजून घेतले आणि त्यातून काहीतरी वेगळं शिकण्याचा आनंद लुटला. युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटरने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच नावीन्यपूर्ण प्रकल्प राबवले आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हेच संस्थेचे मुख्य ध्येय आहे. ही कार्यशाळा हेच सिद्ध करते की, संस्थेचा शिक्षणाबाबतचा दृष्टिकोन भविष्यमुखी आहे. असे मत रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळाचे अध्यक्ष मा.सुदेश कदम सर यांनी व्यक्त केले. Drone Making Workshop at Unitech Computer


या कार्यक्रमाला सर्व शिक्षक व कर्मचारी वर्गाचे मोलाचे योगदान असून त्यांचे विशेष आभार मानण्यात आले. “ही काळाची गरज असून अशा उपक्रमांमुळेच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो,” असे मत संस्थेचे प्रमुख प्रा.जहूर बोट सर यांनी व्यक्त केले. Drone Making Workshop at Unitech Computer