दुर्गाशक्ती, अशोक भुस्कुटे परिवाराचे सहकार्य
रत्नागिरी, ता. 22 : आयुष्यात एकदातरी विमानातून प्रवास करायचा, असे स्वप्न प्रत्येकजण पाहतो. पण सर्वांच्या नशिबी ते असतेच असे नाही. ज्यांना साधा प्रवास करतानाही अनेक अडचणींना सामना करावा लागतो अशा दिव्यांग बांधवांना विमान प्रवास म्हणजे दुरापास्तच. अशा अतितीव्र दिव्यांग बांधवांसाठी दुर्गाशक्ती सामाजिक चळवळ, अशोक भुस्कुटे परिवाराने अनोखी विमान सफर घडवली. जिल्ह्यातील ९ जणांनी याचा लाभ घेत आनंदोत्सव साजरा केला. Dream of air travel for the disabled comes true


तीव्र दिव्यांगत्त्वामुळे, घराचा उंबरठा ओलांडता येत नाही, असा दिव्यांग या विमान प्रवास सहलीसाठी, निवडण्यात येते. गेली अनेक वर्षे, दिव्यांगमित्र अशोक भुस्कुटे हा उपक्रम विनाशुल्क राबवत आहेत. या वर्षी, मुंबई – राजकोट असा, विमान प्रवास करण्याचे निश्चित करण्यात आले. दिनेश पोतनीस (डोंबिवली) यांनी विमान प्रवास, तिकीटाचे, प्रायोजकत्त्व स्वीकारले. चिपळूण नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. Dream of air travel for the disabled comes true


चिपळूणमधून ट्रॅव्हलरने दिव्यांग आपापल्या व्हीलचेअर घेऊन निघाले व मुंबई विमानतळावर पोहोचले. तेथे इंडिगो विमानाच्या कर्मचाऱ्यांनी दिव्यांगाना छान सहकार्य केले आणि विमान राजकोटच्या दिशेने झेपावले. तासाभरात राजकोट विमानतळावर दाखल झाले. नंतर राजकोट, गिरनार, आयुष्यात कधीच न जाऊ शकणाऱ्या दिव्यांगाना रोप-वे ने गिर पर्वतावर सफर घडवण्यात आली. पहिले ज्योतिर्लिंग सोरटी सोमनाथचे दर्शन, गिर नॅशनल पार्क व जंगल सफारी घडवली. दिव्यांगांनी दिव्यांगत्त्व विसरून पर्यटनाचा आनंद घेतला. Dream of air travel for the disabled comes true


दुर्गाशक्ती अध्यक्षा अश्विनी अशोक भुस्कुटे यांनी, सहभागी दिव्यांगांचे, पुढील आयुष्य सुकर होण्यासाठी काही टीप्स दिल्या. या प्रवासात वेळोवेळी दिव्यांगांना उचलण्याचे कठीण काम समिर नाकाडे, लौकीक सावंत व अमृता भुस्कुटे यांनी लीलया पार पाडले. सारिका चिपळूणकर व अप्पा भोसले, दुर्गा भुस्कुटे, ओम भुस्कुटे, आरोही भुस्कुटे यांचेही सहकार्य लाभले. या सहलीत भारती तबीब (पाजपंढरी), मधुकर मेढेकर (दापोली), स्मिता पाटील (भंडारपुळे), प्रितम कदम (रत्नागिरी), सौरभ पोमेंडकर (गावडे आंबेरे), रक्षंदा आणि रिया चिपळूणकर (चिपळूण), राकेश गोठणकर (कशेळी), सादीक नाकाडे (रत्नागिरी) यांनी सहभाग घेतला. Dream of air travel for the disabled comes true
“अशा उपक्रमांना प्रतिसाद देत, घर सोडा आणि आहे त्या परिस्थितीत आनंद शोधा आणि तो मिळवा.” – सादीक नाकाडे, अध्यक्ष, रत्नागिरी हॅंडिकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशन. Dream of air travel for the disabled comes true