रत्नागिरी, ता. 08 : भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये योग, आयुर्वेद आणि सनातन भारतीय संस्कृती चा प्रचार प्रसार करण्यासाठी आणि प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी परमपूज्य स्वामी रामदेव महाराज तसेच आचार्य बाळकृष्ण महाराज यांनी अहर्निश प्रयत्न केले आहेत. परमपूज्य स्वामीजींच्या प्रेरणेने स्थापन झालेली पतंजली योग समिती व पतंजली परिवारातील अन्य संस्था त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्य जोमाने पुढे नेत आहेत. त्याचा एक भाग म्हणून परमपूज्य स्वामीजींचे परमशिष्य, संस्थांचे केंद्रीय मुख्य प्रभारी डॉक्टर पूज्य परमार्थ देवजी येत्या शुक्रवार दि. ११ ते १५ एप्रिल या कालावधीमध्ये रत्नागिरी जिल्ह्याला भेट देणार आहेत. Dr. Parmarth Dev on a tour of Ratnagiri
डॉ. परमार्थ देव हे आजीवन सेवाव्रती संन्यासी असून मातृभूमीच्या सेवेसाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले आहे. ते उच्चविद्या विभूषित असून त्यांनी संस्कृत साहित्यामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. ‘उपनिषदांमध्ये योग विद्या’ यावर संशोधन करून विद्यावाचस्पती ही पदवी संपादन केली आहे. सध्या ते पतंजलि विश्वविद्यालयामध्ये दर्शन विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. भारत स्वाभिमान ट्रस्टचे मुख्य केंद्रीय प्रभारी म्हणून १९ राज्यांमध्ये संघटनेच्या विस्ताराचे काम केले. Dr. Parmarth Dev on a tour of Ratnagiri


१२ एप्रिल रोजी दापोली येथे नवभारत छात्रालयामध्ये पहाटे ५.३० ते ७ या वेळेमध्ये योग शिबिरामध्ये मार्गदर्शन करणार आहेत. १३ एप्रिल ते मंगळवार १५ एप्रिल असे तीन दिवस रोज सकाळी ६ ते ८ या वेळेमध्ये रत्नागिरी शहरातील प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे योग शिबिरामध्ये मार्गदर्शन करणार आहेत. १३ एप्रिल रोजी सकाळी ११ ते १ या वेळेमध्ये लांजा येथे कार्यकर्त्यांना व योग साधकांना मार्गदर्शन करणार आहेत. १५ एप्रिलला सकाळी ११ ते १२.३० या वेळेमध्ये कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या महामहोपाध्याय डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्रामध्ये “उपनिषदांमध्ये योग विद्या” या विषयावर व्याख्यान देणार आहेत. या सर्व कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पतंजली परिवारातील पतंजलि योग समिती, भारत स्वाभिमान ट्रस्ट, युवा भारत, किसान सेवा समिती, महिला पतंजली योग समितीने केले आहे. Dr. Parmarth Dev on a tour of Ratnagiri