• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 July 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

माने-मयेकर यांच्या वाढदिवसानिमित्त कबड्डी स्पर्धा

by Guhagar News
January 14, 2024
in Ratnagiri
77 1
0
माने-मयेकर यांच्या वाढदिवसानिमित्त कबड्डी स्पर्धा
152
SHARES
433
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

जिल्हास्तरीय स्पर्धेत दापोली गजानन संघर्ष संघ विजेता तर दसपटी, चिपळूण संघ उपविजेता

रत्नागिरी, ता.14 : भाजपाचे रत्नागिरी विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळ माने, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशोक मयेकर यांच्या वाढदिवसानिमित्त विठ्ठल- रखुमाई मित्रमंडळ व कबड्डी असोसिएशन, भाजपा आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद गजानन संघर्ष, दापोलीच्या संघाने पटकावले. उपविजेतेपद दसपटी, चिपळूण संघाला मिळाले. माजी खासदार नीलेश राणे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. District Level Kabaddi Tournament on Birthday

District Level Kabaddi Tournament on Birthday

अंतिम सामना फारच रोमहर्षक व चुरशीचा झाला. क्रीडा रसिकांनी भरभरून दाद दिली. विजेत्या संघाला 51000 रु. व चषक देऊन गौरवण्यात आले. उपविजेत्यांना 25000 रुपये व चषक देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेत तृतीय क्रमांक महापुरुष रत्नागिरी संघाला 15000 रुपये व चषक आणि चौथा क्रमांक जय हिंद जय आबा या संघाला 10000 रुपये व चषक देऊन गौरवण्यात आले. District Level Kabaddi Tournament on Birthday

या कार्यक्रमाला बाळ माने, अशोक मयेकर, माजी जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शहराध्यक्ष राजन फाळके, तालुकाध्यक्ष दादा दळी, तालुकाध्यक्ष विवेक सुर्वे, राजू मयेकर, दादा ढेकणे, अमित विलणकर, बावा नाचणकर, मुन्ना खामकर, हेमंत शेट्ये, मंदार खंडकर प्रमुख उपस्थित होते. या वेळी माजी खासदार राणे यांनी मुंबईच्या धर्तीवर आपण आज तेवढ्या दर्जाचे कबड्डी सामने रत्नागिरीमध्ये भरवले आहात, याबाबत आयोजकांचे कौतुक केले. District Level Kabaddi Tournament on Birthday

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संकेत मयेकर, विठ्ठल- रखुमाई मंडळाचे कार्यकर्ते पराग हेळेकर, प्रवीण हेळेकर, भाई चव्हाण, साई टिकेकर, राजू तोडणकर, समीर तिवरेकर, मंदार मयेकर, मनोज फणसोपकर, वैभव हेळेकर, अवधूत शेट्ये, सुनील सावंत आदी सर्वांनी खूप मेहनत घेतली. District Level Kabaddi Tournament on Birthday

Tags: District Level Kabaddi Tournament on BirthdayGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share61SendTweet38
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.