गुहागर, ता. 24 : दिव्यांगांना केलेली फळझाडे व उत्पन्न देणारे वॄक्षांचे वाटप पुण्यकर्म समजून आप्तजनांच्या आठवणी या माध्यमातून कायमस्वरूपी ताज्या ठेवण्यासाठीचा हा माने कुंटुंबीयांचा उपक्रम समाजासाठी नक्कीच आदर्शवत असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष एक्सेल कंपनीचे प्रतिनिधी श्री.चंद्रकांत चाळके यांनी केले. स्मृतीशेष विश्वास माने यांच्या स्मृतिदिनी वृक्ष वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी लोटे MIDC मधील प्रसिद्ध उद्योजक श्री. प्रशांत लाड यांनी जेवढे होईल तेवढी मदत करण्याचे आश्वासन दिले. Distribution of trees on Memorial Day


समाजाचे ऋण आपण कोणत्या ना कोणत्या पद्धतीने फेडत असतो. यासाठी माने कुंटुंबीयांनी योग्य मार्ग अवलंबला आहे. तसेच गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेची गेली २१ वर्षांची मेहनत, चिकाटी, आणि विनादाग लेखापरीक्षण यामुळे मी भारावून गेलो आहे. माने कुंटुंबाच्या वतीने श्री. माने सर यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी समाजाप्रती आपण काही देणं लागतो या भावनेने त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त वरवेली येथील गुहागर तालुका अपंग पुर्नवसन संस्था यांच्या कार्यालयाजवळ उपस्थित दिव्यांगांना फळझाडे व उत्पन्न देणारे वॄक्षांचे वाटप कार्यक्रम करण्यात आला. Distribution of trees on Memorial Day
स्मृतीशेष प्राचार्य विश्वास शंकर माने हे गुहागर शिक्षण संस्था संचलित श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, गुहागर मधून २०१२ साली सेवानिवृत्त झाले. त्यांनी सन १९८८ ते १९९९ सालापर्यंत मुख्याध्यापक म्हणून काम पाहिले. तर १९९९ ते २०१२ पर्यंत उपमुख्याध्यापक म्हणून काम पाहिले. आपल्या दुरदृष्टी, कडक शिस्त आणि शिक्षण हाच धर्म मानून संस्था व शाळेला नावारूपाला आणण्यात मोलाचा वाटा उचलला. त्यांचे अनेक विद्यार्थी आज नामवंत उद्योजक, विविध महत्वाच्या पदावर अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. Distribution of trees on Memorial Day


सन २०२० मध्ये कोरोना कठीण काळामध्ये त्यांना रोगाचे निदान न झाल्याने ते दि. २३/०९/२०२० रोजी काळाने घाला घातला. त्यांच्यापश्चात पत्नी वंदना ( सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षिका) तसेच मिथुन फार्मासिस्ट म्हणून, डॉ. मंदार त्वचारोगतज्ञ म्हणून आणि मयुरेश माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. आज त्यांना जावून ४वर्षाचा कालावधी लोटला तरी त्यांच्या आठवणी अजूनही मनात घर करून आहेत. माने यांच्या ४थे पुण्यस्मरण दिनानिमित्त गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्था यांच्या मुख्य कार्यालयात फळ व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी एक्सेल कंपनीचे प्रतिनिधी श्री. चंद्रकांत चाळकेसाहेब, लोटे MIDC मधील प्रसिद्ध उद्योजक श्री. प्रशांत लाडसाहेब, आणि संदीप आंब्रे समाजसेवक आदी मान्यवर उपस्थित होते. Distribution of trees on Memorial Day