गुहागर, ता. 02 : कृषीदिनाचे औचित्य साधून मळण येथे ज्येष्ठ नागरिक व सेवानिवृत्त केंद्रप्रमुख श्री. श्रीधर जगन्नाथ वझे यांनी विद्यार्थ्यांना जांभूळ व चिंच या वृक्षरोपांचे विनामूल्य वाटप केले. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी वृक्षांचे महत्त्व व वृक्षतोडीमुळे पर्यावरणावर झालेले परिणाम याबाबत मार्गदर्शन केले. Distribution of tree saplings at Malan
जांभूळ व चिंच ही झाडे काळाच्या ओघात कमी होत आहे. यामुळे केवळ मानवाचेच नव्हे तर निसर्गातील प्राण्यांचेही संतुलन बिघडले आहे. त्याचाच परिणाम उपद्रवी प्राण्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला आहे. म्हणून निसर्गातील प्राण्यांनाही उपयुक्त होतील व मानवाला ही उपयुक्त ठरतील अशी झाडे लावण्याचा व वाढवण्याचा आपल्या पूर्वजांचा दृष्टिकोन त्यांनी सविस्तर विशद केला. यावेळी विद्यार्थ्यांनीही त्यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आपणही आपल्या जमिनीत अशी झाडे लावून त्यांचे संगोपन करू, असा निर्धार व्यक्त केला. यावेळी श्री. श्रीधर वझे गुरुजी यांच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. जितेंद्र पाटील यांनी समाधान व्यक्त केले. Distribution of tree saplings at Malan