गुहागर, ता. 09 : रत्नागिरी प्रादेशिक परिवहन विभागाच्या सहकार्याने इन्फिगो खेड शाखेच्यावतीने शृंगारतळी येथील रिक्षाचालकांची नेत्र तपासणी करुन त्यांना मोफत चष्मा वाटप करण्यात आले. पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात हा उपक्रम राबविण्यात आला. Distribution of glasses to rickshaw pullers


इन्फिगो खेड शाखेने हे शिबीर आयोजित केले होते. यामध्ये इतर रुग्णांची मोफत नेत्रतपासणी करण्यात आली तर शृंगारतळीतील रिक्षाचालकांची नेत्र तपासणी करुन त्यांना मोफत चष्मा वाटप करण्यात आले. यासाठी डॉ. सिध्देश देवघरकर, डॉ. स्नेहा माने, डॉ. निशा जाधव, डॉ. दीपिका शिंदे यांचे सहकार्य लाभले. यावेळी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष महेश कोळवणकर, सत्यप्रकाश चव्हाण, तंटामुक्ती अध्यक्ष अजित बेलवलकर, शाबिरभाई साल्हे, अजय खाडे, दिनेश चव्हाण, प्रमोद चव्हाण, अमिश कदम आदी उपस्थित होते. Distribution of glasses to rickshaw pullers