गुहागर सिटी अप्लायर्स क्लब तर्फे वाटप
गुहागर, ता. 13 : गणेशोत्सवासाठी येणाऱ्या सर्व भक्त गणांना स्वगृही परत नेण्याकरता आलेल्या गुहागर आगारातील सर्व चालक वाहकांकरता लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी च्या वतीने फूड पॅकेट देण्यात आली. Distribution of Food Packet to ST Driver Carriers


गणेशोत्सवाच्या दरम्यान गुहागरमध्ये सर्व हॉटेल्स बंद असतात. अशा वेळेला बाहेरगावातील डेपोतून आलेल्या सर्व चालक वाहकांचे जेवणाचे हाल होतात. गेल्या वर्षीपासून लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीने ही हंगर ऍक्टिव्हिटी सुरू केली. आजही अडीचशे चालक वाहकांना फूड पॅकेट देऊन सन्मानित केले. लायन्स निखिल तांबट यांनी या ऍक्टिव्ह मध्ये मोलाचे योगदान देऊन जे सहकार्य केले. यावेळी लायन सिटी गुहागरचे अध्यक्ष डॉ. अनिकेत गोळे, मनीष खरे, श्यामकांत खातू, सुधाकर कांबळे, संतोष वरंडे, सचिन मुसळे, डॉ मयुरेश बेंडल सुरेंद्र मर्दा, गुहागरकर आधी उपस्थित होते. Distribution of Food Packet to ST Driver Carriers

