पालशेत मधील २७० ग्रामस्थांना वाटप
गुहागर, ता. 27 : तालुक्यातील पालशेत येथील “आम्ही कोकणस्थ” पालशेतचे संस्थापक अध्यक्ष गुरुदास मदन साळवी यांच्यावतीने गावातील २७० ग्रामस्थांना व जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांनाही प्रथमोपचार पेटीचे वाटप करण्यात आले. सदर प्रथमोपचार पेटी वाटप कार्यक्रम पालशेत हायस्कूल हॉलमध्ये संपन्न झाला. Distribution of first aid kits to villagers in Palshet


यावर्षी कोकणस्थ पालशेतच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटप कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये एकूण १७४ ग्रामस्थांनी याचा लाभ घेतला. तसेच चांगल्या प्रतीचे ७० मोफत देण्यात आले. संस्थेच्या वतीने तालुकास्तरीय दिवस रात्र क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आल्या. जनसेवा हीच ईश्वर सेवा या ब्रीद वाक्याने या संस्थेचे काम चालू आहे यापुढे आपण ग्रामस्थांच्या आरोग्याविषयी जे जे करणे शक्य आहे ते प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करेन असे आश्वासन आम्ही कोकणस्थ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुदास साळवी यांनी दिले. या कार्यक्रमाला पाटपन्हाळे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक प्रकाश बापट, रवींद्र कानिटकर, आरोग्यसेविका अंकिता पालकर, नाना पालकर, निलेश विखारे, श्रीकांत फणसे आदी उपस्थित होते. Distribution of first aid kits to villagers in Palshet