उद्योजक गुरूदास साळवी यांच्यातर्फे पालशेत येथे वाटप
गुहागर, ता. 01 : तालुक्यातील पालशेत गावचे सुपुत्र, उद्योजक गुरूदास साळवी यांनी आम्ही कोकणस्थच्या माध्यमातून पालशेत गावातील दोन दिव्यांगांना इलेक्ट्रिक सायकल वाटप करून बांधिलकी जपत एक नवीन आदर्श समोर ठेवला आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त रखुमाई पांडुरंग पालशेतकर माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय पालशेत येथे हे वाटप करण्यात आले. Distribution of electric bicycles to the disabled
पालशेत गावातील तुषार धोपावकर, संतोष पालकर या दिव्यांगांना इलेक्ट्रिक सायकल वाटप करण्यात आली आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले भाजपचे गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे म्हणाले की, आपले शिक्षण ज्या प्रशालेत पूर्ण झाले ज्या गावात आपण वाढलो, त्या गावाच्या, शाळेच्या प्रती ऋण व्यक्त करण्याचा एक आदर्श गुरूदास साळवी यांनी ठेवून एक समाजपयोगी काम केले आहे. आपल्या व्यवसायातून मिळणाऱ्या नफ्यातून गोरगरीबांसाठी दातृत्व करणे हे महान कार्य आहे. गेल्या वर्षभरात आम्ही कोकणस्थ संस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रमशील उपक्रम राबविण्यात आले आहेत, हे कौतुकास्पद आहेत असे सांगत गुरूदास साळवी यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. Distribution of electric bicycles to the disabled


पालशेत गावातील तुषार धोपावकर, संतोष पालकर या दिव्यांगांना इलेक्ट्रिक सायकल वाटप करण्यात आली आहे. त्या माध्यमातून छोटासा व्यवसाय निर्माण करून रोजगार निर्मिती करावी तरच खऱ्या अर्थाने या कामाचे सार्थक होईल. गावातील विद्यार्थ्यांनी आपण कितीही मोठे झालो तरी आपल्या गावाला, शाळेला विसरता कामा नये. भविष्यातील पिढीला सक्षम आणि व्यवसाय निर्मिती करून रोजगार संधी करून देण्यासाठी हे महत्त्वाचे आहे. यावेळी आम्ही कोकणस्थ संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तिरंगा तसेच अल्पोपहार वाटप करण्यात आले. Distribution of electric bicycles to the disabled
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोज जोगळेकर, माजी उपसरपंच रविंद्र कानिटकर, अशोक चव्हाण, अभिजित भुजबळ, सचिन ओक, सिताराम पटेकर, महेश तोडणकर, अनिल साळवी, रमेश साळवी, सर्वेश गुहागरकर, सुभाष सावंत, राकेश नार्वेकर, अजित साळवी, सर्व शिक्षक, कर्मचारी, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. Distribution of electric bicycles to the disabled