गुहागर, ता. 20 : शीर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच व शाळा व्यवस्थापन समिती स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधी श्री.अमित साळवी यांच्या माध्यमातून विनिता राऊत व विजय राऊत यांच्यातर्फे शीर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वह्या व पेन बॉक्सचे वाटप करण्यात आले. Distribution of educational materials to students
यावेळी बोलताना विजय राऊत यांनी सांगितले की, आम्ही शिक्षण घेत असताना अतिशय कठीण परिस्थितीतून जावे लागले. यावेळी दहावीपर्यंत पायात घालायला चप्पल मिळत नव्हती की पुरेसे शैक्षणिक साहित्य मिळत नव्हते. त्यामुळे अशा गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये या समस्यांचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी हा छोटासा प्रयत्न या शाळेचा माजी विद्यार्थी म्हणून करत आहे. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनायक गुरव व मुख्याध्यापक सुहास गायकवाड यांनी या दोन्ही उभयतांचे व त्यांचे चिरंजीव यश यांचे आभार व्यक्त केले. तसेच सदर देणगी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल अमित साळवी यांचेही आभार व्यक्त केले. यावेळी शाळेतील पदवीधर शिक्षिका सौ. प्रमोदिनी गायकवाड उपशिक्षिका सौ. मृणाली रेडेकर, श्री. अजय खेराडे ग्रामपंचायत कर्मचारी श्री. महेश पवार उपस्थित होते. Distribution of educational materials to students