• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 May 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सचिन या संस्थेतर्फे शीर शाळेला शैक्षणिक साहित्य वाटप

by Ganesh Dhanawade
October 15, 2024
in Guhagar
120 1
0
केंद्रशाळा शीर येथे शैक्षणिक साहित्य वाटप करताना

Distribution of educational materials to Sheer School

235
SHARES
672
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 15 : मागाठाणे विधानसभा आमदार प्रकाशदादा सुर्वे  व युवा कार्यकारीणी यांच्या संकल्पनेतून तसेच शीर गावचे सुपुत्र व मुंबईतील प्रसिद्ध हेअर आर्टिस्ट सचिन टक्के यांच्या सचिन सामाजिक व शैक्षणिक संस्था मुंबई यांच्यातर्फे आदर्श केंद्रशाळा शीर नंबर १ येथे सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. Distribution of educational materials to Sheer School

गेली अनेक वर्ष श्री. सचिन टक्के यांच्या संस्थेतर्फे विविध शाळांमध्ये अशा प्रकारचे उपक्रम घेण्यात येत आहेत. तसेच तरुणांना व्यावसायिक संधी उपलब्ध व्हावी याच्यासाठी या संस्थेमार्फत विविध उपक्रम घेतले जात आहेत. यावेळी विजय ताम्हणकर यांच्या माध्यमातून सचिन टक्के यांनी शाळेला वॉटर प्युरिफायर ही उपलब्ध करून दिला. Distribution of educational materials to Sheer School

यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनायक गुरव, संस्थेचे अध्यक्ष सचिन टक्के, बाळकृष्ण शिर्के, संदेश भाटकर, राहुल पवार, अमित साळवी, हेमंत गुरव, विद्याधर गुरव, अनिल बेर्डे, सुरेश टक्के, संदेश वाटकर, मुख्याध्यापक सुहास गायकवाड, शिक्षक प्रमोदिनी गायकवाड, मृणाली रेडेकर, अजय खेराडे अंगणवाडी सेविका लक्ष्मी शिर्के तसेच गावातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. गरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक हातभार लावण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे अशी भावना यावेळी उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली. Distribution of educational materials to Sheer School

Tags: Distribution of educational materials to Sheer SchoolGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share94SendTweet59
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.