गुहागर, ता. 07 : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या वतीने यावर्षी सन २०२५/२६ या शैक्षणिक वर्षासाठी दिव्यांग विद्यार्थी, दिव्यांगांची मुले व गरीब होतकरू विद्यार्थी ” यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे. सदरचा कार्यक्रम रविवार दिनांक १५ जून २०२५ रोजी संस्थेच्या कार्यालय वरवेली चिरेखाण फाटा येथे सकाळी ११ वाजता संपन्न होणार आहे. गरीब होतकरू व दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, याकरिता गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्था हा उपक्रम गेली २२ वर्ष अविरतपणे राबवत आहे. Distribution of educational materials through disability organizations


तरी सर्व सभासदांनी व दिव्यांग विद्यार्थ्यांनी तसेच गरीब होतकरु विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमास वेळेवर उपस्थित राहावे. या कार्यक्रमास येताना विद्यार्थ्यांनी मार्कलिस्ट घेऊन यावे. तसेच प्रत्यक्ष विद्यार्थी उपस्थित राहतील असे पाहावे. पालकांनी विद्यार्थ्यांना घेऊन यावे. फक्त विद्यार्थ्यांनाच शैक्षणिक साहित्य दिले जाईल, पालकांकडे दिले जाणार नाही याची नोंद घ्यावी, व संस्थेला सहकार्य करावे. असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष उदय रावणंग यांनी केले आहे. Distribution of educational materials through disability organizations