संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 19 : बुद्धिस्ट कल्चरल ट्रस्ट (रजि.) यांच्या विद्यमाने आंतरराष्ट्रीय भिमाई स्मारकाचे प्रणेते व दि बुध्दिस्ट कल्चरल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब खरे यांच्या ७८ व्या जयंतीनिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. रायगड जिल्ह्यातील कर्जत झुगरेवडी येथील उच्च प्राथमिक शाळा झुरगेवडी विद्यार्थांना संस्थेच्या सचिव व कार्यक्रमाच्या संयोजिका प्रियाताई खरे व पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. Distribution of educational material on Khare Jayanti
यावेळी अभिमन्यु भालेराव, रमेश जाधव, राजेश खरे, बौध्दाचार्य नारायण जाधव तसेच शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र काजळे यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन करून विद्यार्थांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळाराम जाधव, अक्षय जाधव, बंदेश जाधव तसेच गावचे माजी सरपंच रखमा पारधी, सदस्य सुनिल सावळा, भाऊदादा झुगरे, जनार्दन पारधी, नाना पारधी, दत्तू सावळा, तुकाराम झुगरे, गणपत केवशि आदींनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी बहुसंख्येने शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी अल्पोहार देऊन सफाई अभियाना राबवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. Distribution of educational material on Khare Jayanti