गुहागर, ता. 19 : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या वतीने सालाबादाप्रमाणे रविवार दिनांक १६/0६/२०२४ रोजी दिव्यांग/ दिव्यांग पालकांची मुलं/गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष श्री. उदय रावणंग यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाला १५८ विद्यार्थ्यांना उपस्थित होते. Distribution of Educational Material
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व कार्यक्रम अध्यक्ष श्री. श्रीधर वझे निवृत् शिक्षक, संस्थेचे जेष्ठ सल्लागार श्री. विनायक ओक सर, प्राध्यापक दांडेकर सर, श्री. धोंडये सर, श्री. पेटकर साहेब, श्री. पाध्ये साहेब, संस्थेचे सल्लागार व गुहागर हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. सुधाकर कांबळे सर, संस्थेचे कायदेशीर सल्लागार अँड. श्री. सुशील अवेरे, प्राध्यापक श्री. म्हात्रे सर, सौ. सोनाली सुहास सातार्डेकर मॅडम, श्री. सोहम सुहास सातार्डेकर संस्थेचे कार्यकारी पदाधिकारी व सल्लागार आदि मान्यवर व अनेक दिव्यांग सभासद् व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. Distribution of Educational Material
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. अध्यक्ष श्री. उदय रावणंग यांनी शैक्षणिक साहित्याचे महत्त्व पटवून देताना म्हणाले की, संस्थेच्या २२ वर्षाच्या प्रवासात विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लागणारे साहित्य दरवर्षी वाटप करतात. मुलांचे शैक्षणिक नुकसान व शिक्षणापासून वंचित राहू नये कारण मुलांजवळ वह्या वैगरे साहित्य नसते , ही उणीव संस्थेने गेली २२ वर्ष अविरतपणे लक्षात घेवून हा कार्यक्रम सुरू ठेवला आहे. या शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाला १५८ विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्याहस्ते वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या वह्या, कंपास पेटी, कलर बाॅक्स , पेन , स्कूल बॅग इत्यादी साहित्यांचे वाटप करण्यात आले. उर्वरित गरीब होतकरू विद्यार्थ्यांना आपापल्या शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप केले जाईल. Distribution of Educational Material
या कार्यक्रमासाठी मनसे गुहागर तालुका संपर्कप्रमुख मा श्री. प्रमोदजी गांधी, मा. श्री. ससोनी ट्रेडर्स गुहागरचे सुहासजी सातार्डेकर, शासकीय स्टॅम्प वेंडर मा. श्री. हेमचंद्रजी मोरे, अभिषेक एन्टरप्रायझेस वरवेली डायरेक्टर मा. श्री. पंढरीजी किर्वे, पापा संजीवनी ट्रस्ट मुंबई, मा. श्री. योगेंद्रजी विचारे वरवेली, मा.श्री. भाई बोरकर दाभोळ, मा. श्री. एल. जे. धनवानी चिपळूण आदि मान्यवरांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक श्री. प्रकाश अनगुडे तर आभार संस्थेचे सदस्य श्री. भरत कदम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सरचिटणीस श्री. सुनील रांजाणे, खजिनदार श्री. सुनील मुकनाक, श्री. शंतनु रांजाणे, श्री. श्रवण रावणंग, श्री. संतोष घुमे आदिनी विशेष प्रयत्न केले. गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेने राबविलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. Distribution of Educational Material