• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
12 May 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर अपंग पुनर्वसन संस्थेतर्फे विविध पुरस्कारांचे वितरण

by Ganesh Dhanawade
April 28, 2025
in Guhagar
53 0
0
Distribution of awards by Guhagar Disabled Rehabilitation Institute
104
SHARES
297
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 28 : तालुक्यात दिव्यांगानी दिव्यांगांसाठी स्थापन केलेल्या सेवाभावी संस्था असून संस्थेत सर्व प्रकारचे १४००  हून अधिक दिव्यांग सभासद आहेत. या गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेला २३ वर्षे पूर्ण होत असून गेल्या २३ वर्षांमध्ये दिव्यांगांसाठी वेगवेगळे यशस्वी उपक्रम राबवल जात आहेत. या संस्थेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून दि. ३० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता वरवेली चिरेखाण फाटा येथील कार्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. Distribution of awards by Guhagar Disabled Rehabilitation Institute

यानिमित्ताने प्रथमच राज्यस्तरीय दिव्यांग, विधुर, विधवा, घटस्फोटीत तसेच सर्वसामान्य व्यक्तींसाठी वधू वर सूचक मेळाव्याचे आयोजन केलेले आहे. गरीब व गरजू दिव्यांगांचा कृत्रिम साहित्याचे वाटप तसेच संस्थेमार्फत विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा, शिक्षकांचा, शाळांचा आणि केंद्रांचा सत्कार समारंभ आयोजित केला आहे. त्याचप्रमाणे संस्थेला तन – मन – धन अर्पून ज्यांनी सहकार्य केले आहे, अशा व्यक्तींचा दिव्यांग मित्र व दिव्यांग साथी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. Distribution of awards by Guhagar Disabled Rehabilitation Institute

यावर्षीचा संस्थेमार्फत दिला जाणारा दिव्यांग मित्र पुरस्कार २०२५ चे मानकरी चिपळूणचे सामाजिक कार्यकर्ते व गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच दिव्यांगांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सतत प्रयत्न करणारे संदीप अनंत आंब्रे आणि दिव्यांग साथी पुरस्कार वरवेली गावचे पत्रकार गणेश जगन्नाथ किर्वे यांना, तर स्वयं सिद्ध पुरस्कार क्रिशा कल्पेश देवळे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. Distribution of awards by Guhagar Disabled Rehabilitation Institute

या कार्यक्रमासाठी तालुक्यातील लोकप्रतिनिधी, उद्योजक, सर्व शासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच ३ ते ४.३० वा. महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला आहे. तरी या वर्धापन कार्यक्रमास  सर्व दिव्यांग बांधवांनी तसेच समाजातील व्यक्तींनी उपस्थित रहावे, अशी विनंती संस्थेचे अध्यक्ष उदय रावणंग  व सरचिटणीस सुनील रांजाणे यांनी केले आहे. Distribution of awards by Guhagar Disabled Rehabilitation Institute

Tags: Distribution of awards by Guhagar Disabled Rehabilitation InstituteGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share42SendTweet26
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.