गुहागर, ता. 29 : तहसील कार्यालय, नगरपंचायत गुहागर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रत्नागिरी यांच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण गुहागर समुद्रकिनारी संपन्न झाले. यामध्ये अंतर्गत पाणी बचाव तंत्र कोरडे आणि सुके प्रथमोपचार मूलभूत जीवन समर्थन कार्डिओषल्मोनरी रिसुसीटेशन(सीपीआर), सुधारित फ्लोटिंग उपकरणांचा वापर आदी विषयांवर एनडीआरएफच्या जवानांकडून प्रशिक्षण देण्यात आले. Disaster Management Training at Guhagar
भविष्यात नैसर्गिक आपत्ती तसेच समुद्रात, धरण किंवा नदीच्या पाण्यात एखादी व्यक्ती बुडाल्यास त्या व्यक्तीचा बचाव करणे किंवा परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास प्राथमिक मदत व बचाव कार्य म्हणून महसूल विभाग, नगरपंचायत पंचायत समिती, पोलीस विभाग येथील अधिकारी, कर्मचारी नागरिकांना तसेच रत्नागिरी गॅस अँड पावर कंपनीतील सुरक्षा रक्षक यांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एन.डी आर.एफ.) यांच्याकडून प्रशिक्षण देण्यात आले. Disaster Management Training at Guhagar
गुहागर समुद्र किनारी पर्यटकांची वाढती संख्या त्यामुळे आपत्ती घडण्याचा धोका अधिक आहे. आपत्ती घडल्यानंतर तातडीने बचाव आणि मदत करण्यासाठी सक्षम यंत्रणा असणे गरजेचे झाले होते. निसर्ग चक्रीवादळ, अतिवृष्टी, इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाचे सर्वांना प्रशिक्षण असणे अतिशय गरजेचे झाले आहे. आपत्ती घडल्यानंतर मुंबई, पुण्यातून येणाऱ्या एनडीआरएफच्या पथकाला बराच अवधी लागतो. आपत्तीच्या कालावधीत प्रत्येक क्षण महत्त्वाचा असल्याने सर्व अधिकारी कर्मचारी तसेच नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्राथमिक प्रशिक्षणे गरजेचे यासाठीच हे प्रशिक्षण घेण्यात आले होते. या प्रशिक्षणामध्ये गुहागर तहसीलदार परीक्षित पाटील, आरजीपीपीएलचे सुरक्षा अधिकारी सोमनाथ मिश्रा, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे पी.एस.घाडगे यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. Disaster Management Training at Guhagar
या प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे कमांडर आर, जे. यादव, गुहागरचे तहसीलदार परीक्षित पाटील पोलीस निरीक्षक सचिन सावंत, आरजीपीपीएल कंपनीचे सुरक्षा अधिकारी सोमनाथ मिश्रा, गुहागर नगरपंचायतचे अभियंता विजय भूतल, लेखापाल अमोल पुराणिक, वरिष्ठ लिपिक जनार्दन भोसले, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे सहाय्यक उपनिरीक्षक पी.एस.घाडगे, पंचायत समितीचे उपअभियंता मंदार छत्रे, पत्रकार गणेश किर्वे, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे व एनडीआरएफचे जवान तसेच महसूल विभाग, गुहागर नगरपंचायत, पोलीस ठाणे गुहागर येथील सर्व अधिकारी व कर्मचारी व महाविद्यालयातील विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते. Disaster Management Training at Guhagar