गुहागर, ता. 16 : तालुक्यातील तवसाळ येथील श्री महामाई सोनसाखळी मंदिरात देवदिवाळीचा उत्सव आनंदात सुरु आहे. रविवारी 17 डिसेंबराला देवीचे रुपे उतरविण्याचा कार्यक्रम होणार आहे. तरी महामाई सोनसाखळीवर श्रध्दा असलेल्या सर्व भाविकांनी रविवारपर्यंत दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. Devdiwali at Mahamai Sonsakhli Temple


गुहागर तालुक्यातील तवसाळची ग्रामदेवता महामाई सोनसाखळी मंदिरात देवदिवाळीचा उत्सव 5 दिवस साजरा केला जातो. देवदिवाळीच्या दिवशी मंदिरातील देवदेवतांना रुपे लावले जाते. वस्त्र, अलंकारांनी देवदेवता सजविल्या जातात. मंदिरात सजावट, विद्यूत रोषणाई केली जाते. या देवीच्या दर्शनासाठी गावातील भाविकांबरोबरच रत्नागिरी जिल्हातील, तसेच मुंबई, पुणे आदि शहरातून भाविक श्रध्देने येतात. Devdiwali at Mahamai Sonsakhli Temple


देवदिवाळीपासून दररोज मंदिरात भजनसेवा केली जाते. त्यासाठी पंचक्रोशीतील, दशक्रोशीतील भजनमंडळींना निमंत्रीत केले जाते. गेली अनेक वर्ष सातत्याने काही भजन मंडळी सेवेसासाठी इथे येतात. या सर्वांचा सन्मान देवस्थानच्या विश्र्वस्तांमार्फत केला जातो. Devdiwali at Mahamai Sonsakhli Temple


ग्रामदेवता महामाई सोनसाखळी मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. नव्या मंदिराचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. तरी देवदिवाळीनिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी सढळ हस्ते आर्थिक मदत करावी असे आवाहन देवस्थानच्या विश्र्वस्तांनी केले आहे. Devdiwali at Mahamai Sonsakhli Temple