• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

तवसाळ य़ेथे देव दिपावली उत्सव

by Guhagar News
December 13, 2024
in Guhagar
114 1
0
Dev Diwali festival at Tavasal
223
SHARES
638
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मंदिराचा जीर्णोध्दार अंतिम टप्प्यात, भाविकांना मदतीचे आवाहन

गुहागर, ता. 13 : तालुक्यातील तवसाळ येथील श्री महामाई सोनसाखळी मंदिरात देव दिवाळी निमित्त उत्सव – जागर सोहळा संपन्न झाला.  यावेळी विविध ठिकाणाहून आलेल्या भक्तांना जीर्णोध्दारच्या अंतिम टप्प्यासाठी मदत करण्याचे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले. Dev Diwali festival at Tavasal

Dev Diwali festival at Tavasal

2 डिसेंबर 2024 ते शुक्रवार दि. 6 डिसेंबर या कालावधीत तवसाळ गावातील पंचक्रोशीचे मंदिर म्हणून ओळख असलेल्या श्री महामाई, सोनसाखळी, श्री देव रवळनाथ, त्रिमुखी, सोमजाई  मंदिरात देव दिपावलीचा जागर उत्सव सोहळा मोठ्या आनंदात संपन्न झाला. या उत्सवापूर्वी मंदिराला रंग रंगोटी करून, आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. यानिमित्ताने तवसाळ पंचक्रोशीतून पूर्वीच्या काळी निघुन गेलेले भक्तगण आपल्या कुटुंबीयांसमवेत ग्रामदेवतेच्या दर्शनाला आले होते. त्याचप्रमाण देशाच्या, राज्याच्या विविध भागात रहाणारी तवसाळ गाव असणारी कुटुंबेही देव दिपावलीच्या निमित्ताने गावी आली होती. हजारो भाविकांनी दर्शनासाठी ग्रामदेवतेच्या मंदिरात गर्दी केली होती. पंचक्रोशीतील विविध भजन मंडळींनी आपली सेवा अर्पण केली. Dev Diwali festival at Tavasal

महामाई, सोनसाखळी, श्री देव रवळनाथ, त्रिमुखी, सोमजाई  मंदिराचा जीर्णोध्दार गेली  2 वर्ष सुरु आहे. आता मंदिराचे रुप पालटले असून अजुनही थोडे काम बाकी आहे. त्यामुळे सदर मंदिराच्या अंतिम टप्प्यातील कामासाठी भाविकांनी सढळ हस्ते मंदिराला मदत करावी असे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. Dev Diwali festival at Tavasal

Tags: Dev Diwali festival at TavasalGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share89SendTweet56
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.