मंदिराचा जीर्णोध्दार अंतिम टप्प्यात, भाविकांना मदतीचे आवाहन
गुहागर, ता. 13 : तालुक्यातील तवसाळ येथील श्री महामाई सोनसाखळी मंदिरात देव दिवाळी निमित्त उत्सव – जागर सोहळा संपन्न झाला. यावेळी विविध ठिकाणाहून आलेल्या भक्तांना जीर्णोध्दारच्या अंतिम टप्प्यासाठी मदत करण्याचे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले. Dev Diwali festival at Tavasal
2 डिसेंबर 2024 ते शुक्रवार दि. 6 डिसेंबर या कालावधीत तवसाळ गावातील पंचक्रोशीचे मंदिर म्हणून ओळख असलेल्या श्री महामाई, सोनसाखळी, श्री देव रवळनाथ, त्रिमुखी, सोमजाई मंदिरात देव दिपावलीचा जागर उत्सव सोहळा मोठ्या आनंदात संपन्न झाला. या उत्सवापूर्वी मंदिराला रंग रंगोटी करून, आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. यानिमित्ताने तवसाळ पंचक्रोशीतून पूर्वीच्या काळी निघुन गेलेले भक्तगण आपल्या कुटुंबीयांसमवेत ग्रामदेवतेच्या दर्शनाला आले होते. त्याचप्रमाण देशाच्या, राज्याच्या विविध भागात रहाणारी तवसाळ गाव असणारी कुटुंबेही देव दिपावलीच्या निमित्ताने गावी आली होती. हजारो भाविकांनी दर्शनासाठी ग्रामदेवतेच्या मंदिरात गर्दी केली होती. पंचक्रोशीतील विविध भजन मंडळींनी आपली सेवा अर्पण केली. Dev Diwali festival at Tavasal
महामाई, सोनसाखळी, श्री देव रवळनाथ, त्रिमुखी, सोमजाई मंदिराचा जीर्णोध्दार गेली 2 वर्ष सुरु आहे. आता मंदिराचे रुप पालटले असून अजुनही थोडे काम बाकी आहे. त्यामुळे सदर मंदिराच्या अंतिम टप्प्यातील कामासाठी भाविकांनी सढळ हस्ते मंदिराला मदत करावी असे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. Dev Diwali festival at Tavasal