• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 August 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ग्राम. जानवळे उपसरपंच वैभवी जानवळकर यांचा राजीनामा

by Mayuresh Patnakar
August 14, 2026
in Guhagar
16 0
0
Deputy Sarpanch Vaibhavi Janwalkar resigns
31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 14 : तालुक्यातील जानवळे ग्रामपंचायतच्या उपसरपंच वैभवी विनोद जानवळकर यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा ग्रामपंचायत अधिकारी सोनावणे यांच्याकडे सुपूर्द केला. वैभवी विनोद जानवळकर यांच्या रूपाने जानवळे गावामध्ये मनसेने २०१७ रोजी पहिले खाते खोलले होते. त्यावेळी २०२१ रोजी उपसरपंच निवडणूकित मनसेच्या वैभवी विनोद जानवळकर यांचा कुलकर्णी यांच्यासमोर एका मताने पराभव झाला होता. यानंतर पुन्हा २०२२ मध्ये सदस्य पदाची निवडणूक विजयी झाल्यानंतर ठराविक सदस्यांनी उपसरपंचपदी वैभवी विनोद जानवळकर यांची निवड व्हावी, असा ग्रामस्थ यांनी आग्रह धरला. Deputy Sarpanch Vaibhavi Janwalkar resigns

त्यानुसार मनसेचे उपजिल्हा अध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या सौभाग्यवती वैभवी जानवळकर यांची १ ऑक्टोबर २०२४ मध्ये बिनविरोध निवड झाल्याने गावामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. गावातील लोकांनी एकजुटीने दिलेला हा निर्णय जानवळकर कुटुंबासाठी समाधानकारक असल्याचे मत त्यावेळी उपसरपंच वैभवी विनोद जानवळकर यांनी व्यक्त केले. दरम्यान उपसरपंच पदाचा आपल्याला दिलेला कालावधी ठरल्याप्रमाणे संपला असल्याने वैभवी विनोद जानवळकर यांनी स्वतःहून आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा ग्रामसेवक सोनवणे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. Deputy Sarpanch Vaibhavi Janwalkar resigns

ज्याप्रमाणे आपल्याला मोठ्या विश्वासाने गावाने व सदस्य यांनी पदावरती विराजमान केले. त्याचप्रमाणे आपल्याला दिलेला कालावधी संपल्याने त्यांनी स्वतः राजीखुशीने दिलेला शब्द पाळत वैभवी जानवळकर यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. वैभवी जानवळकर यांनी आपल्या उपसरपंच पदाच्या कालावधीत अनेक सामाजिक कामे व विकास कामे केली आहेत. त्यांना त्यांच्या कोरोनातील कामाबद्दल शितल राजे फाउंडेशन चिपळूण कोकण फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट चिपळूण यांच्यावतीने सन्मानपत्र देऊन कोविड योद्धा म्हणून देखील सन्मानित करण्यात आले होते. Deputy Sarpanch Vaibhavi Janwalkar resigns

Tags: Deputy Sarpanch Vaibhavi Janwalkar resignsGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share12SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.