प्रवाशी राजा दिनानिमित्त गुहागर तालुका प्रवासी संघटनेच्या वतीने निवेदन
गुहागर, ता. 02 : गुहागर आगाराला नव्या 25 गाड्या मिळाव्यात तसेच आवश्यक कामगार व कार्यशालेत साहित्य मिळावे, यासाठी उपस्थित अधिकारी यांना गुहागर तालुका प्रवासी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी रत्नागिरी येथून जिल्हा व्यवस्थापक बोरसे आगार प्रमुख अशोक चव्हाण व सुनील पवार यांनी मार्गदर्शन केले तसेच उपस्थिती प्रवाशी व पदाधिकारी यांच्या समस्या जाणून घेतल्या. Demand for new Bus for Guhagar Agra


दरम्यान गुहागर आगाराला नवीन 25 गाड्या मिळाव्यात अशी मागणी केल्यानंतर उपस्थिती अधिकारी बोरसे यांनी सांगितले की, गुहागर आगाराला येत्या काही दिवसात दहा नवीन गाड्या देण्याचा प्रयत्न आहे. यावेळी संघटनेचे विद्यमान अध्यक्ष पराग कांबळे, उपाध्यक्ष सुहास शेटे, प्रभुनाथ देवळेकर, खजिनदार रमाकांत खेडेकर, विनायक मुले, रवींद्र दीक्षित, अमृता जोशी, महिला अध्यक्ष यांसेसह अन्य प्रवाशी उपस्थितीत होते. Demand for new Bus for Guhagar Agra
यावेळी प्रवासी संघटनेचे पदाधिकारी प्रभुनाथ देवळेकर यांनी गुहागर ते डेरवण गाडी नव्याने सुरु करावी. गुहागर गणेशखिंड मार्ग ही सेवा दोन तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला सोईची पडेल असे म्हटले. तसेच गुहागर असगोली या मार्गांवर नवीन गाडी मिळावी. यासाठी सरपंच छाया कटनाक व उप सरपंच प्रदीप घाणेकर ग्रामपंचायत सदस्य संजय घुमे आदी उपस्थितीत होते. Demand for new Bus for Guhagar Agra