मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांचा केला पराभव
गुहागर, 04 : रविवारी सर्वांनीच निवडणुकीचे निकाल पाहीले असतील. मात्र निकालांच्या धामधुमीत एका धोतर नेसणाऱ्या तरुण उमेदवाराचे यश झाकोळले गेले. त्याने तेलगंणाचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष या दोघांचाही पराभव केला. विशेष म्हणजे या उमेदवाराच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती अक्कलकोट विधानसभेचे आमदार व सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांनी कामारेड्डी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार के वेंकट रमना रेड्डी यांनी 66652 मते घेत विजय मिळवला आहे. त्याहीपेक्षा विशेष म्हणजे या मतदारसंघातून उभ्या असलेल्या तेलगंणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि तेलंगणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी या दोन्ही दिग्गज उमेदवारांचा पराभव केला. Defeat of Chief Minister and State President
या मतदारसंघात रेड्डी यांनी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (BRS) यांचा 6741 मतांनी आणि तेलंगणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांचा 11736 मतांनी पराभव केला आहे. काँग्रेसने तेलंगणात बहुमत मिळवले असून काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार म्हणून प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांच्याकडे पाहीले जाते. कदाचित मुख्यमंत्री पदाची धूराही त्यांच्याकडे येऊ शकते. तर सलग दोन वेळा तेलंगणाचे मुख्यमंत्री राहीलेले के चंद्रशेखर राव लोकप्रिय होते. त्यामुळे कामारेड्डी मतदार संघातील निवडणूक बहुचर्चित झाली होती. या दोन भारीभक्कम नेत्यांचा परावभ एका सामान्य भाजप कार्यकर्त्यांने केला. म्हणूनच ते या निवडणुकीतील जायंट किलर ठरले. Defeat of Chief Minister and State President
भाजपचे उमेदवार के वेंकट रमना रेड्डी यांचे प्रचार प्रमुख होते महाराष्ट्राती आमदार सचिन कल्याणशेट्टी. पक्षाने त्यांच्यावर जबाबदारी सोपविल्यावर गेले दोन महिने कल्याणशेट्टी कामारेड्डी मतदारसंघात तळ ठोकून होते. त्यांनी भाजपचे उमेदवार के वेंकट रमना रेड्डी यांच्या प्रचाराचे नियोजन तर केलेच त्याशिवाय मतदारसंघातील अनेक व्यक्तींच्या वैयक्तिक गाठीभेटी घेतल्या. प्रचाराच्या छोट्या छोट्या सभा घेतल्या. विजया नंतर भाजपचे उमेदवार के वेंकट रमना रेड्डी यांनी आपल्या विजयात सचिन कल्याणशेट्टींचा मोठा वाटा असल्याचे सांगितले. आकडा ओलांडला आहे, आतापर्यंत 64 जागा जिंकल्या आहेत आणि के चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील बीआरएस सरकार पाडण्यासाठी सज्ज आहे. Defeat of Chief Minister and State President