११११ दिव्यांनी ४ दिवस उजळणार राम मंदिर
गुहागर, ता. 30 : तालुक्यातील नरवण येथील श्री राम मंदिरात हिंदू धर्मात आध्यात्मिक क्षेत्रात फार महत्त्वाचे स्थान आहे दीपोत्सवाचे सलग १७ व्या वर्षी श्रीराम दीपोत्सव मंडळाच्या वतीने दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सन 2008 साली श्रीराम दीपोत्सव मंडळाच्यावतीने या दीपोत्सवाला प्रारंभ करण्यात आला. ३१ ऑक्टोबर २०२४ ते ३ नोव्हेंबर २०२४ या ४ दिवसीय दीपोत्सवाचे आयोजन मोठ्या उत्साहात आणि विविध कार्यक्रमाने करण्यात आले आहे. Deepotsav at Naravan Ram Temple


गुरुवार दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७:३० वाजता डॉक्टर श्री कैलास सुरेश वैद्य यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून व महाआरतीने या दीपोत्सवाचा शुभारंभ होणार आहे. शुक्रवार दिनांक १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७:३० महा आरती, रात्री १० वा.स्वरसंध्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७:३० वा. महाआरती व रात्री ठीक १० वाजता श्रीराम नमन नाट्य मंडळ, कामथे, हुमणेवाडी, तालुका चिपळूण यांचे पारंपारिक नमन सादर केले जाणार आहे. रविवार दिनांक ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता महाआरती व स्थानिक भजने होऊन या दीपोत्सवाची सांगता केली जाणार आहे. गुहागर तालुक्यामध्ये मागील १७ वर्ष सलग ४ दिवस ११११ दिवे उजळून साजरा होणारा दीपोत्सव हा एकमेव असून या दीपोत्सवाला व आयोजित केलेल्या सर्व कार्यक्रमाला तालुकावासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीराम दीपोत्सव मंडळ नरवण यांनी केले आहे. Deepotsav at Naravan Ram Temple



