उरण धक्क्यावर बोट लावताना समुद्रात पडून दुर्दैवी मृत्यू
गुहागर, ता. 06 : वेळणेश्वर येथील 27 वर्षीय तरुण सिद्धेश शांताराम मोरे याचा सोमवार दि. 05 ऑगस्ट रोजी रायगड जिल्ह्यातील उरण येथील समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आज त्याच्यावर वेळणेश्वर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले सिद्धेश च्या मागे त्याची आई पाच वर्षांचा मुलगा आणि पत्नी अशा परिवार आहे. Death of the sailor of Velneshwar by drowning
एक ऑगस्टला मच्छीमारी व्यवसायाला पुन्हा सुरुवात झाली आणि वेळणेश्वर वाडी खाते येथील सिद्धेश हा खलाशी म्हणून उरण (करंजा) रायगड येथील बोट मालक किसन कोळी यांच्या बोटीवर खलाशी म्हणून रुजू झाला. मासेमारी करून सोमवारी पाच ऑगस्टला सकाळी सिद्धेश ज्या बोटीवर होता ती बोट करंजा बंदरात उभी राहिली होती बोट नांगरून झाल्यानंतर एक दोरी बंदरावर बांधण्यासाठी सिद्धेश बोटीतून उतरला आणि पोहत धक्क्यावर येत होतात मात्र धक्क्यापर्यंत तो पोचू शकला नाही अचानक सिद्धेश पाण्यात बुडाला. पाण्याची पातळी जास्त खोल असल्याने शोध कार्यात अडथळा येत होता मात्र पाण्याची पातळी कमी झाल्यावर म्हणजे समुद्राला ओहोटी सुरू झाल्यानंतर मृतदेह त्याच ठिकाणी आढळून आला. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. Death of the sailor of Velneshwar by drowning
ही माहिती रायगड मधून वेळणेश्वरला येऊन धडकली आणि गावावर दुःखाची छाया पसरली, सिद्धेश मोरे हा 27 वर्षे तरुण सर्वांमध्ये मिळून मिसळून वावरणारा होता. इतक्या लहान वयात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. सिद्धेशचा मृतदेह काल रात्री उशिरा वेळणेश्वरला त्याच्या घरी आणण्यात आला आज सकाळी वेळणेश्वर मध्ये शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गेले दोन महिने गावात राहून मित्रमंडळींबरोबर मौज मजा करणारा घरात कुटुंबाबरोबर आनंदात सुट्टी घालवणारा सिद्धेश मच्छीमारी सुरू झाल्यानंतर लगेचच सगळ्यांचा निरोप घेऊन आपल्या कामावर रुजू झाला होता मात्र अवघ्या पाच दिवसातच त्याने या जगाचा निरोप घेतला. Death of the sailor of Velneshwar by drowning