• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वेळणेश्वरच्या सिध्देशचा अपघाती मृत्यू

by Mayuresh Patnakar
August 6, 2024
in Guhagar
446 4
2
Death of the sailor of Velneshwar by drowning
875
SHARES
2.5k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

उरण धक्क्यावर बोट लावताना समुद्रात पडून दुर्दैवी मृत्यू

गुहागर, ता. 06 : वेळणेश्वर येथील 27 वर्षीय तरुण सिद्धेश शांताराम मोरे याचा सोमवार दि. 05 ऑगस्ट रोजी रायगड जिल्ह्यातील उरण येथील समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आज त्याच्यावर वेळणेश्वर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले सिद्धेश च्या मागे त्याची आई पाच वर्षांचा मुलगा आणि पत्नी अशा परिवार आहे. Death of the sailor of Velneshwar by drowning

एक ऑगस्टला मच्छीमारी व्यवसायाला पुन्हा सुरुवात झाली आणि वेळणेश्वर वाडी खाते येथील सिद्धेश हा खलाशी म्हणून उरण (करंजा) रायगड येथील बोट मालक किसन कोळी यांच्या बोटीवर खलाशी म्हणून रुजू झाला. मासेमारी करून सोमवारी पाच ऑगस्टला सकाळी सिद्धेश ज्या बोटीवर होता ती बोट करंजा बंदरात उभी राहिली होती बोट नांगरून झाल्यानंतर एक दोरी बंदरावर बांधण्यासाठी सिद्धेश बोटीतून उतरला आणि पोहत धक्क्यावर येत होतात मात्र धक्क्यापर्यंत तो पोचू शकला नाही अचानक सिद्धेश पाण्यात बुडाला. पाण्याची पातळी जास्त खोल असल्याने शोध कार्यात अडथळा येत होता मात्र पाण्याची पातळी कमी झाल्यावर म्हणजे समुद्राला ओहोटी सुरू झाल्यानंतर मृतदेह त्याच ठिकाणी आढळून आला. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. Death of the sailor of Velneshwar by drowning

ही माहिती रायगड मधून वेळणेश्वरला येऊन धडकली आणि गावावर दुःखाची छाया पसरली, सिद्धेश मोरे हा 27 वर्षे तरुण सर्वांमध्ये मिळून मिसळून वावरणारा होता.  इतक्या लहान वयात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. सिद्धेशचा मृतदेह काल रात्री उशिरा वेळणेश्वरला त्याच्या घरी आणण्यात आला आज सकाळी वेळणेश्वर मध्ये शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गेले दोन महिने गावात राहून मित्रमंडळींबरोबर मौज मजा करणारा घरात कुटुंबाबरोबर आनंदात सुट्टी घालवणारा सिद्धेश मच्छीमारी सुरू झाल्यानंतर लगेचच सगळ्यांचा निरोप घेऊन आपल्या कामावर रुजू झाला होता मात्र अवघ्या पाच दिवसातच त्याने या जगाचा  निरोप  घेतला. Death of the sailor of Velneshwar by drowning

Tags: Death of the sailor of Velneshwar by drowningGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share350SendTweet219
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.