दि. 3 डिसेंबर रोजी; न्यायासाठी ‘ऑफ्रोह’ची जिल्हाधिकारी यांना विनंती
गुहागर, ता. 01 : रूपेश पवार हे दिव्यांग असून ते अनेक दिव्यांग संस्थेवर काम करतात. त्यांनी मंडणगड तहसिल कार्यालयामध्ये CSC केंद्र व झेरॉक्स सेंटर सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणेबाबत विनंती केली होती. Death fast of Rupesh Pawar with disabilities
याबाबत मंडळ अधिकारी, मंडणगड यांनी त्यांचा जबाब घेवून शासन निर्णयानुसार ‘शासकीय जमिनीमध्ये 200 स्केआर फुट जागा देण्यास काही हरकत नसल्याचा अहवाल सादर केला आहे. मात्र अद्यापही याबाबत सकारात्मक निर्णय जिल्हाधिकारी किंवा तहसिलदार मंडणगड यांजकडून कळविण्यात आलेला नसल्याने रूपेश पवार यांनी जागतिक अपंग दिनी 3 डिसेंबर पासून तहसिल कार्यालय मंडणगडसमोर आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला आहे. याबाबत जिल्हाधिकारी, रत्नागिरी व तहसिलदार मंडणगड यांना निवेदन सादर केले आहे. Death fast of Rupesh Pawar with disabilities


याबाबत ऑफ्रोहने दिव्यांग रूपेश पवार यांनी त्यांच्या उदरनिर्वाहासाठी CSC सेंटर व झेरॉक्स केंद्र चालविण्यासाठी जागेची मागणी शासन निर्णयानुसारच केली असल्याने मा.जिल्हाधिकारी व मा. तहसिलदार मंडणगड महोदयांनी रूपेश पवार यांना न्याय द्यावा, अशी विनंती ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन (ऑफ्रोह) चे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष गजेंद्र पौनीकर यांनी लेखी पत्राद्वारे केली आहे. Death fast of Rupesh Pawar with disabilities