रत्नागिरी, ता. 19 : झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या पुण्यतिथीनिमित्त रत्नागिरी कर्हाडे ब्राह्मण सहकारी संघामध्ये राणीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच संस्थेच्या आवारात वृक्षारोपणही केले. संस्थेचे सभासद विनोद प्रभूदेसाई यांनी संस्थेला रोपे भेट स्वरूपात दिली. ती संस्थेच्या आवारात लावण्यात आली. Death anniversary of Rani Lakshmibai
यावेळी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, सदस्य चंद्रकांत हळबे, सौ. प्रतिभा प्रभुदेसाई, अॅड. सौ. प्रिया लोवलेकर, उदय काजरेकर, मानस देसाई, सुहास ठाकुरदेसाई, सचिव सौ. शिल्पा पळसुलेदेसाई यांच्यासमवेत के. जी. एन. सरस्वती फाउंडेशनचे उपाध्यक्ष डॉ. शरद प्रभुदेसाई, कमिटी सदस्य अशोक घाटे, रिया काजरेकर, सौ. सीमा खांडेकर, सोहम खांबेटे, श्री. तांबे उपस्थित होते. Death anniversary of Rani Lakshmibai