रत्नागिरी. ता. 29 : पुनर्रचित हवामान आधारित आंबा पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ३० नोव्हेंबर ही शेवटची तारीख असून, जास्तीत जास्त कर्जदार, बिगर कर्जदार, आंबा बागायतदार, ऐच्छिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी शत्रुघ्न म्हेत्रे यांनी केले आहे. Deadline till Saturday for crop insurance
श्री. म्हेत्रे म्हणाले की, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांसाठी २०२४-२५ साठी भारतीय कृषी विमा कंपनीची निवड करण्यात आली आहे. आंबा पीक विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आंबा पीक विमा योजनेचा हप्ता ३० नोव्हेंबरपूर्वी बँक किंवा विकास सोसायटी सेवा, सीएससी केंद्र व पीक विमा पोर्टलवरती भरावा. गारपीट या हवामान धोक्यापासून विमा संरक्षणासाठी अतिरिक्त विमा हप्ता लागू राहील. ज्या शेतकऱ्यांना गारपीट या हवामान धोक्याचे अतिरिक्त विमा संरक्षण घ्यायचे आहे त्यांनी मूळ हवामान धोक्यासहित फक्त बँकेमार्फत विमा प्रस्ताव सादर करावयाचा आहे. अधिसूचित हवामान धोका विचारात घेऊन विमा काढला पाहिजे. भाडेपट्टी कराराने शेतीवरील फळ पिकांचा विमा-नोंदणीकृत (रजिस्टर्ड) भाडेपट्टी करार अनिवार्य आहे, असे म्हेत्रे यांनी सांगितले. Deadline till Saturday for crop insurance