काँक्रिटीकरणाला मुहूर्त सापडेना
गुहागर, ता. 04 : गुहागरचे एस. टी. आगारातील पथदिप दुरूस्त करण्यात आले असून आगार प्रकाशमान झाले आहे. मात्र वर आलेली खडी आजही धोकादायक ठरत असून सदर काँक्रीटीकरणाला अद्याप मुहूर्तच मिळालेला नाही. Darkness away In Guhagar Agar
गुहागर आगारातील कार्यशाळा व प्रशासकीय कामकाजाठिकाणी हायमास्टसहीत लख्ख प्रकाश पडलेला दिसून येत होता. मात्र ज्या प्रवाशाच्या भरवशयावर एस. टी. चालते. त्याच प्रवाशाला मात्र अंधारात चाचपडत एस. टी. सेवा घ्यावी लागत आहे. याबाबत वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल आगारप्रमुख व विभागीय पातळीवरून घेण्यात आली आहे. वृत्त प्रसिद्ध होताच तातडीने दिवे दुरूस्त करण्यात आले आहेत. पार्कीगच्या ठिकाणी नादुरूस्त टयुबही बसवीण्यात आल्या असून आगार प्रकाशमान झालेले दिसून येत आहे. मात्र अजूनही आगारातील खड्डे पडलेले व खडीवर आलेली स्थिती कायम असून येथील काँक्रीटीकरणाला अदयाप मुर्हुत मिळत नसल्याचे दिसून येत आहे. Darkness away In Guhagar Agar
दरम्यान डिसेंबर २०२३ रोजी येथील कॉक्रीटीकरणाचे काम अलोरे येथील आशिष मुहारेकर यांना देण्यात आले आहे. सदर प्रलंबीत कामाची बातमी प्रसिद्ध होताच दोन दिवसातच कामाला सुरूवात करतो असे येथील आगारप्रमुख सोनाली कांबळे यांना सांगितले होते. परंतु अदयाप काम सुरू केलेले नाही. यामुळे ठेकेदाराने एस. टी. महामंडाळाच्या अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी सुरू ठेवली आहे. याबाबत आगारप्रमुख सोनाली कांबळे यांनी पथदिप दुरुस्ती ही संबधीत ठेकेदाराकडून करवून घेतले आहेत. मात्र काँक्रीटीकरण करणाऱ्या ठेकेदाराने आज येतो उदया येतो असे म्हणत अजूनही काम प्रलंबीत ठेवले असल्याचे सांगितले. Darkness away In Guhagar Agar