कोणतीही जीवितहानी नाही
गुहागर, ता. 09 : तालुक्यातील पडवे येथील मुरलीधर यशवंत गडदे यांच्या घराच्या बाजुला असलेल्या डोंगरभागाची दरड कोसळून घराची भिंत पडली आहे. गुरूवारी मध्यरात्री हा प्रकार घडला आहे. घराच्या स्वयंपाक खोलीच्या भिंतीवर दरडीतील दगड पडल्याने ही भिंतच पडली आहे. मात्र घरातील लोक सुखरूप आहेत. Darad collapse damage


दरम्यान, तालुक्यातील पडवे येथील मुरलीधर यशवंत गडदे आपल्या कुटुंबातील 6 सदस्यांसह या घरामध्ये राहत आहेत. गुरूवारी मध्यरात्री दरड घराच्या स्वयंपाक खोलीच्या भिंतीवर कोसळल्याने घराची भिंत पडली आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण भिंत पडल्याने घराचे नुकसान झाले आहे. Darad collapse damage